भाषा न समजल्याने योगींच्या प्रचारसभेतून महिलांचं 'वॉकआऊट'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:32 AM2019-04-08T11:32:44+5:302019-04-08T11:33:31+5:30
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी येथे सभा घेतली.
हैदराबाद - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सभा घेतल्या. हैदराबाद येथेही भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. या दौऱ्यावेळी योगींनी असुदुद्दीन औवेसी, चंद्राबाबू नायडू आणि काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला. मात्र, हैदराबादच्या जहिराबाद येथे योगींच्या या सभेतून अचानक गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तेलुगू भाषिक महिलांना योगींची हिंदी भाषा समजत नसल्याने त्यांनी योगींच्या सभेतून काढता पाय घेतला.
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी येथे सभा घेतली. मात्र, या सभेत योगींच्या भाषणाचा अर्थ न समजल्याने तेथील महिलांनी निम्म्यातूनच बाहेर जाणे पसंद केले. योगी यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली होती. मात्र, योगी काय बोलताहेत हेच न समजल्यामुळे या सभेतील महिलांनी काढता पाय घेत तेथून निघून जाणे पसंद केले. कारण, या सभांवेळी योगी आदित्यनाथ यांचे हिंदीतून भाषण होत होते. मात्र, तेथील स्थानिक महिलांना हिंदी न समजल्यामुळे त्यांनी वॉकआऊट केलं. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सभांवेळी तेलंगणात स्थानिक भाषेतील ट्रान्सलेटरचा वापर करण्यात आला होता. मात्र, यावेळी तशी कुठलिही सुविधा नसल्यामुळे योगींच्या सभेवर ही नामुष्की ओढवली.
जहिराबाद येथे स्थानिक भाजपा नेत्यांनी योगींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली होती. मात्र, मोदींचं भाषण समजत नसल्यामुळे आम्ही सभेतून बाहेर पडल्याचे येथील महिलांनी सांगितले. तसेच भाजपा नेत्यांनी निदान दुभाषिकाची तरी व्यवस्था करायला हवी होती, असेही या संतापलेल्या महिलेने म्हटले. दरम्यान, यापूर्वी तेलुगू नेता आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण आणि मुरलीधर राव हे बड्या नेत्यांच्या सभांवेळी दुभाषिकाची भूमिका बजावत असतात. मात्र, योगींच्या सभेवेळी कुठलाही दुभाषिक नसल्याने सभेतून अनेकांनी वॉक आऊट केले. विशेष म्हणजे या मंचावर तेलुगू नेते टी राजासिंग हे उत्तमप्रकारे हिंदी आणि तेलुगू बोलू शकणारे नेते हजर होते. तर, तेथील स्थानिक जनेतवर त्यांच्या भाषणाचा प्रभावही आहे. पण, भाजपा नेत्यांना हे लक्षातच आले नसावे.
In a public meeting at Peddapalli, Telangana. Watchhttps://t.co/NXFgfKyQ7Wpic.twitter.com/yqMCU6adFH
— Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) April 7, 2019