तक्रारींचा पाऊस! प्रश्न सोडवण्यातही केंद्र सरकार ८८ टक्के गुणांनी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:28 PM2022-07-23T12:28:09+5:302022-07-23T12:30:44+5:30
वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष.
पवन देशपांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केद्र सरकारच्या विविध खात्यांकडे गेल्या २०० दिवसांत ‘मुसळधार पावसासारखा’ तक्रारींचाही पाऊस पडला आहे. मात्र, त्या सोडवण्यातही सरकार अग्रेसर राहिले असून, ६.३९ लाख तक्रारींपैकी ५.४७ लाख तक्रारी म्हणजेच ८८ टक्के तक्रारी सरकारच्या विविध खात्यांनी सोडवल्या आहेत. केद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. १ जानेवारी २०२२ ते २० जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार वित्तीय सेवा (बँकिंग विभाग)च्या सर्वाधिक तक्रारी असून सर्वांत कमी तक्रारी उत्तर-पूर्व क्षेत्र विकास विभागाच्या आहेत.
५२ विभागांनी त्यांच्याकडे आलेल्या एकूण तक्रारींपैकी ९० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २९ विभागांनी ८० टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निवारण केले. ५.४७ तक्रारींचे निवारण मिनिटाला २.२ तक्रारी, २०० दिवस ६.३९ लाख तक्रारी.
संसदीय कार्य ९९.२६ टक्के, वित्तीय सेवा (पेन्शन) ९९.२२% कायदा ९९.२१% नवीन आणि अक्षय ऊर्जा ९९.०६% सहकार १.६८% आरोग्य आणि कुटुंब कल्याण २५.२६% सामाजिक न्याय आणि रोजगार २८.९५% वर्षभरापूर्वीची एकही तक्रार शिल्लक राहिलेली नाही, हे विशेष. १,७८,६०४तक्रारी प्रलंबित