बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 08:54 AM2024-08-01T08:54:12+5:302024-08-01T08:55:09+5:30

bachpan ka pyar mera bhul nahin jana re: लहानपणीच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार बिहारमधून समोर येत आहे. या अनोख्या लग्नात पतीने आपल्या पत्नीचा हात तिच्या लहानपणीच्या प्रियकराच्या हातात सोपविला.

Love of childhood...! Keeping 2 years son with him, the husband got his wife married to her lover in bihar viral trending news | बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले

बचपन का प्यार...! काळजाच्या तुकड्याला सोबत ठेवत पतीने पत्नीचे लग्न लावून दिले

काही दिवसांपूर्वी पतीने आपल्या भावासाबोत पत्नीचे लग्न लावून दिल्याची घटना गाजली होती. आता लहानपणीच्या प्रियकराशी पत्नीचे लग्न लावून दिल्याचा प्रकार बिहारमधून समोर येत आहे. या अनोख्या लग्नात पतीने आपल्या पत्नीचा हात तिच्या लहानपणीच्या प्रियकराच्या हातात सोपविला. या लग्नामुळे पत्नी खूश जरी असली तरी पतीने दोन वर्षांच्या मुलाला आपल्यासोबत ठेवल्याने तिला वाईट वाटत आहे. 

अमहरा पोलीस ठाणे क्षेत्रातील रामनगरमध्ये राहणाऱ्या खूशबूची ही लव्ह स्टोरी आहे. तिचे गावातीलच चंदन कुमारवर प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांनी तिचे लग्न तीन वर्षांपूर्वी राजेशसोबत लावून दिले. लग्न झाले तरी खूशबू काही चंदनला विसरू शकली नव्हती. यामुळे ते दोघे लग्नानंतर गुपचूप भेटत असायचे. 

मंगळवारी झाले असे की चंदन खूशबूला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. त्याला पती राजेश आणि त्याच्या कुटुंबाने रंगेहाथ पकडले. राजेशला जेव्हा त्यांच्या लहानपणापासूनच्या प्रेमाबद्दल समजले तेव्हा त्याने मोठा निर्णय घेतला. चंदन आणि पत्नी खूशबूचे लग्न लावण्याचा. परंतू, त्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट करण्यात आली. ती म्हणजे त्यांचा दोन वर्षांचा मुलगा कोणाकडे राहणार? राजेशच्या संपत्तीवर तिने हक्क सांगितला तर... यावर खूशबूकडून मुलगा पतीकडेच राहणार व त्याच्या संपत्तीवर कोणताही हक्का सांगणार नाही असे लिहून घेण्यात आले. नंतरच या दोघांचे लग्न लावण्यात आले. 

प्रचंड खूश असलेला प्रियकर चंदनने सांगितले की तो खूशबूवर लहानपणापासून प्रेम करायचा. परंतू, तिच्या आई वडिलांमुळे लग्न होऊ शकले नाही. आता खूशबूला मिळविल्याने आनंदी आहे. तर खूशबू म्हणतेय की तिला राजेशसोबतच रहायचे होते, परंतू चंदनसोबत पकडले गेल्याने राजेशने सोबत राहण्यास नकार दिला. 

Web Title: Love of childhood...! Keeping 2 years son with him, the husband got his wife married to her lover in bihar viral trending news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.