इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; 16 वर्षांची मुलगी लग्नासाठी पश्चिम बंगालमधून मध्य प्रदेशात आली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:10 PM2023-03-27T15:10:31+5:302023-03-27T15:13:53+5:30

पश्चिम बंगालमधील 16 वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका मुलाच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर प्रेमाचे नाते जुळले.

love on instagram teenage girl reached vidisha from west bengal | इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; 16 वर्षांची मुलगी लग्नासाठी पश्चिम बंगालमधून मध्य प्रदेशात आली

इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; 16 वर्षांची मुलगी लग्नासाठी पश्चिम बंगालमधून मध्य प्रदेशात आली

googlenewsNext

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये प्रेमाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील 16 वर्षांची मुलगी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका मुलाच्या संपर्कात आली. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर प्रेमाचे नाते जुळले. यानंतर ती सर्व काही सोडून त्या मुलाशी लग्न करण्यासाठी विदिशाला पोहोचली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधील दमदम येथील एक मुलगी विदिशा जिल्ह्यातील एका मुलाच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कात आली आणि प्रेमात पडली. यानंतर त्या मुलाला भेटण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी विदिशा जिल्ह्यातील गंजबासोदा येथे पोहोचली. याबाबत मुलाच्या वडिलांनी चाइल्डलाइनला माहिती दिली. तेथून गंजबासोडा जीआरपी आणि आरपीएफला माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीशी बोलल्यानंतर पथक मुलीला सोबत घेऊन गेले. मुलीने सांगितले की, तिचे आई-वडील तिला मारहाण करायचे. यामुळे आजी-आजोबा तिला वाढवत होते. तिने सोबत काही दागिने आणि पैसेही आणले होते. दुसरीकडे मुलगाही एक लाख रुपये घेऊन घरातून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यानंतरच मुलाच्या घरच्यांना याची माहिती मिळाली.

चाइल्डलाइनच्या समुपदेशक दीपा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्यांच्यासोबत आहे. समितीसमोर हजर केल्यानंतर तिला पश्चिम बंगालला पाठवण्यात येणार आहे. मात्र, मुलगी परत जाण्यास तयार नाही. याबाबत पश्चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: love on instagram teenage girl reached vidisha from west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.