Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 03:57 PM2021-06-12T15:57:29+5:302021-06-12T15:59:54+5:30
कुणाचं नशीब कधी आणि कशी कलाटणी घेईल, कुणीच सांगू शकत नाही. काहीशी अशीच आहे, राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज यांची स्टोरी...
कुणाचं नशीब कधी आणि कशी कलाटणी घेईल, कुणीच सांगू शकत नाही. राजस्थानातील जयपूर येथील रंजीत सिंह राज (Ranjit Singh Raj) यांची कहाणीही काहीशी अशीच आहे. आज ते स्वित्झर्लंडमध्ये राहतात. मात्र, इथवर पोहोचण्यामागे त्यांच्या प्रेमाचा मोठा हात आहे.
एक गरीब कुटुंबात झाला जन्म -
राज यांनी लहानपणापासूनच कष्ट केले. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. ते सांगतात, ‘मी 10वीच्या वर्गात नापास झालो होतो. अभ्यासातही कच्चाच होतो. माझ्या पालकांनी मला काही तरी बनण्यासाठी शाळेत पाठवले होते. कुणालाही माझ्या क्रिएटिव्हिटी आणि कल्पनांशी काही एक देणे-घेणे नव्हते.’
16 वर्षांचे होते, तेव्हाच ते शिक्षण सोडून ऑटोरिक्शा चालवायला लागले. त्यांनी अनेक वर्ष जयपूर येथेच ऑटोरिक्षा चालवली. याचवेळी त्यांच्या लक्षात आले, की टुरिस्टला इंप्रेस करण्यासाठी ऑटो ड्रायव्हर्स इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात. यानंतर त्यांनीही इंग्रजी भाषा शिकायला सुरुवात केली. राज सांगतात, ‘2008 मध्ये जग आयटी क्षेत्राकडे धावत असताना, माझी इंग्रजी शिकण्याची इच्छा होती. यानंतर त्यांनी टुरिझमचा उद्योग सुरू केला. ते परदेशातील लोकांना राजस्थान फिरवत होते.
कमाल! नवरदेवाचं नाव समाजवाद अन् नवरीचं 'ममता बॅनर्जी', तामिळनाडूतील अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा!
येथेच पहिल्यांदा झाली प्रेयसीची भेट -
याच वेळी एका मुलीशी त्यांची भेट झाली. ही मुलगी त्यांची क्लायंट होती. ती भारत भ्रमणासाठी आली होती. राज स्वतःच त्यांना जयपूर दाखवत होते. ‘आम्ही पहिल्यांदा सीटी पॅलेसमध्ये भेटलो. ती तीच्या एका मैत्रिणीसोबत आली होती. आम्ही दोघे एक-मेकांना आवडू लागलो आणि आमचे बोलणे सुरू झाले. यानंतर ती फ्रान्सला निघून गेली. आम्ही दोघेही Skype वरून बोलत होतो. यानंतर आम्ही दोघे प्रेमात आहोत, याची जाणीव आम्हाला झाली.’
अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला -
राज यांनी सांगितले, मी अनेक वेळा तिला भेटण्यासाठी फ्रान्सला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी त्याचा व्हिसा रिडेक्ट होत होता. एवढ्या वेळा व्हिसा रिजेक्ट होऊनही आमचे नाते कायम होते. मग आम्ही दोघे फ्रान्स दुतावासासमोर उपोषणाला बसलो. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना तीन महिन्यांचा व्हिसा देण्यात आला.’
2014 त केलं लग्न -
राज यांनी 2014 मध्ये लग्न केले. एका वर्षानंतर दोघांना एक मुलगा झाला. यानंतर राजने लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज केला. त्यांना फेन्च भाषा शिकावी लागली. आज राज आपली पत्नी आणि मुलासह जेनेव्हा येथे राहतात. ते रेस्टोरन्टमध्ये काम करतात. लवकरच स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.