Love Story: माती खाल्ली! अंधाऱ्या रात्री प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला, अन् तिच्या गावच्या विहीरीतच पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:28 AM2022-02-01T08:28:07+5:302022-02-01T08:28:56+5:30
Love story, Police Rescue Lover: साऱ्या प्रकाराने प्रियकर आणि प्रेयसीचे मात्र हसू झाले. पोलिसांनी गाववाल्यांची यासाठी मदत घेतली. खूप वेळ पाण्यात असल्याने तरुणाला थंडी वाजून आली होती.
उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकर खोल विहीरीत पडला. प्रियकराचे ओरडणे ऐकून गस्तीवर असलेल्या पोलिसांनी विहिरीत डोकावून पाहिले तर महाशय आतमध्ये पडलेला होता. पोलिसांनी लाकडी काठीद्वारे त्याला त्या विहीरीतून बाहेर काढले. या साऱ्या प्रकाराने प्रियकर आणि प्रेयसीचे मात्र हसू झाले.
रात्री अडीच वाजताची ही घटना आहे. तरुणाला विहीरीतून बाहेर काढण्यासाठी काही तास पोलिसांनी रस्सीचा देखील वापर करत कष्ट घेतले. बिजनौरच्या माती गावात हा प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. अंधार असल्याने त्याला विहीरीचा अंदाज आला नाही, विहीर न दिसल्याने तो त्यात पडला. वाचविण्यासाठी तो ओरडू लागला. यामुळे पोलिसांच्या कानावर त्याचा आवाज गेला व वाचला.
पोलिसांनी गाववाल्यांची यासाठी मदत घेतली. खूप वेळ पाण्यात असल्याने तरुणाला थंडी वाजून आली होती. पोलिसांनी तातडीने गावकऱ्यांकडून लाकडी काठी आणि रस्सी मागविली. यानंतर विहीरीत रस्सी टाकून त्याला वरती काढण्यात आले.