सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडामध्ये समोर आला लव्ह ट्रँगल, शूटरची गर्लंफ्रेंड ठरली हत्येचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:33 IST2023-12-12T16:32:46+5:302023-12-12T16:33:04+5:30
Sukhdev Singh Gogamedi murder case: राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडामध्ये समोर आला लव्ह ट्रँगल, शूटरची गर्लंफ्रेंड ठरली हत्येचं कारण
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोगामेडींवर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून ही माहिती समोर आली आहे. एकीकडे या हत्याकांडाचा मास्टरमाईंड रोहित गोदारा हा गोगामेडीवर नाराज होता. त्यातून ही हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या हत्येमागे लव्ह ट्रँगल हे एक कारण असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार शूटर रोहित राठोडच्या प्रेयसीसोबत सुखदेव सिंह गोगामेडीची जवळील वाढली होती. त्यामुळे रोहित गोदारा नाराज होता. तसेच तो मनातल्या मनात धुमसत होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार रोहित राठोडच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. या काळात सुखदेव सिंह गोगामेडी त्याच्या गर्लफ्रेंडची बाजू मांडत होता. त्यामुळे रोहितच्या मनात सुखदेवबाबत राग वाढत होता.
गोगामेडींवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड रोहित गोदारा हा सिग्नल अॅपच्या माध्यमातून शूटर्सच्या संपर्कात होता. तसेच चारण आणि रोहित राठोड हत्येच्या आधी आणि नंतर सातत्याने संपर्कात होते. सोमवारी पोलिसांनी एअर हॉस्टेसचं शिक्षण घेत असलेल्या पूजा सैनी या तरुणीला अटक केली होती. तिने या हत्येमध्ये वापरलेली हत्याचे पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच सुखदेव सिंहची रेकी करण्यातही मदत केली होती. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात दोन शूटर्ससह पाच इतर आरोपींना अटक केली आहे.