प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:38 PM2023-01-23T23:38:40+5:302023-01-23T23:50:15+5:30

लग्नानंतर तरुणीने सन्मानपूर्वक मुलाच्या महेशपूर येथील घरात जोडीने प्रवेश केला.

Love won... 'Shubh Mangal Saavdhan' with lover only after 86 hours of agitation in front of hous in dhanbad jharkhand | प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

googlenewsNext

आपल्या प्रियकरासोबतच लग्न करायचा हट्ट घेऊन प्रियकराच्या घराबाहेर आंदोलनास बसलेल्या तरुणीला अखेर यश मिळालं. अखेर तरुणीचं प्रेम जिंकलं अन् दोघांच्या लग्नाला मान्यता मिळाली. झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील हे प्रेमप्रकरण सध्या चर्चेत आहे. तुरुंगात जाण्याच्या भीतीने ४ दिवसांपासून तरुणीच्या सुरू असलेल्या आंदोलनापुढे प्रियकर झुकला. गंगापूर येथील लिलौर मंदिरात समाज आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत रविवारी उत्तम कुमार यांचं ल्ग्न झालं. विवाहाचे सर्वच विधी मंदिराचे पुजारी उदय तिवारी यांनी पूर्ण केले. यावेळी, ग्रामस्थही हजर होते. 

लग्नानंतर तरुणीने सन्मानपूर्वक मुलाच्या महेशपूर येथील घरात जोडीने प्रवेश केला. विशेष म्हणजे मुलाने लग्नास नकार दिल्यानंतर या युवतीने तब्बल ८६ तास मुलाच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. या तरुणीचे आंदोलन मीडियातून समोर आल्यानंतर गुरुवारी बाघमारा महिला पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्री १० वाजता आंदोलनस्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी या युवतीला पोलीस ठाण्यात नेले, दरम्यान तिथे तरुणीने आपल्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली. त्यामध्ये, मुलासह इतर चौघांना आरोपी करण्यात आले होते. तर, स्वत:चा जबाबही नोंद केला होता. मात्र, अटकेच्या भीतीने तरुणाने मुलीला पत्नी म्हणून स्विकारले आणि लग्न करुन घरात घेतले. 

लग्नावेळी मुलगी नवरीच्या वेशाष सजून धजून आली होती. सकाळी ११ वाजता मुलगी लग्नस्थळी मंदिरात पोहोचली, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दोन्ही कुटुंबातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान, मुलीसोबत ४ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर उत्तम कुमारने लग्नास नकार दिला होता. 
 

Web Title: Love won... 'Shubh Mangal Saavdhan' with lover only after 86 hours of agitation in front of hous in dhanbad jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.