मेहंदी काढली, हळद लावली, नवरी नटली अन् लग्नाच्या वेळी ड्रायव्हरसोबत पळाली, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 04:13 PM2023-05-06T16:13:37+5:302023-05-06T16:14:29+5:30
एका लग्नसोहळ्याच्या आनंदात वधू पळून गेल्याने विरजण पडले आहे.
राजस्थानमधील चित्तौडगडमध्ये एका लग्नसोहळ्याच्या आनंदात वधू पळून गेल्याने विरजण पडले आहे. मात्र, मुलाकडच्यांना हा प्रकार कळताच त्यांनी घाईघाईने शोधमोहीम सुरू केली आणि मध्यरात्री नवरी आणि तिच्या भावाला पकडलं. याच दरम्यान, या वधूचा प्रियकरही तेथे सापडला. नातेवाईकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. लुटेरी दुल्हनचे वडील फरार आहेत. आजारपणाचं कारण सांगून आई रुग्णालयात दाखल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्तौडगडमधील पाओटा चौकात राहणाऱ्या राजेंद्र चपलोतचे लग्न झालरापाटन येथील अंकितासोबत ठरलं होतं. 5 मे पर्यंत सर्व काही ठीक होतं. मात्र 5 मे रोजी रात्री अंकिताचे वडील आणि तिचे कुटुंबीय कशावरून तरी रागावले आणि तेथून निघून गेले. वर राजेंद्र तेथे पोहोचला. मात्र तोपर्यंत नववधू अंकिता, तिचे वडील, तिचा एक भाऊ आणि मेहुणीने चित्तौडगड सोडले होते. त्यानंतर मध्यरात्री अंकिता आणि तिच्या भावाला पकडण्यात आले. अंकिता आणि राजेंद्र यांचे लग्न एका मध्यस्थाच्या माध्यमातून ठरवण्यात आल्याचे समोर आले.
50 हजार रुपयांचा व्यवहार झाला. लग्नासाठी अंकिताच्या कुटुंबीयांना बरीच रक्कमही देण्यात आली होती. एक तरुण वधूच्या कुटुंबासोबत ड्रायव्हर म्हणून आला होता. यावरून वराच्या कुटुंबीयांचा वधूच्या कुटुंबाशी वाद झाला. नंतर कळते की तो अंकिताचा प्रियकर आहे. वर राजेंद्रची आई गायत्री देवी यांनी सांगितल्यानुसार, लग्नाची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. लग्नात सहभागी होण्यासाठी नातेवाईकही पोहोचले होते. हळदी, मेहंदी आणि संगिताचे आयोजन करण्यात आले होते. स्वागताची तयारी झाली.
दरम्यान, ही घटना घडली आणि लग्नाची सर्व तयारी राहिली. या संपूर्ण घटनेने दुखावलेल्या राजेंद्र या वराचे वडील सुरेश यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मुलाच्या लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधारे पोलीस सध्या या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. वराच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, लवकर समजल म्हणून बरं झालं. नाहीतर धोका वाढला असता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.