नात्यात लागायचे भाऊ-बहीण, एकमेकांवर गुपचूप करायचे प्रेम; पकडल्यावर झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 04:38 PM2023-06-21T16:38:27+5:302023-06-21T16:45:42+5:30
दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे.
झारखंडमधील गढवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यात भाऊ-बहीण असणाऱ्या प्रियकर-प्रेयसीचं परस्पर संमतीने ग्रामस्थांसमोर लग्न लावण्यात आलं आहे. हे प्रकरण गढवा जिल्ह्यातील खरौंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपा पंचायतीच्या कुपा टोला दामर गावाशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये भाऊ-बहिणीचं नातं असल्याचं म्हटलं जात आहे.
दोघेही वर्षभरापासून एकमेकांसोबत असायचे. दोघांचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीचे लोक आणि गावातील मंडळींसमोर विवाह सोहळा पार पडला. ब्रजेश कुमार भुईया असं प्रियकराचं नाव असून मैत्रिणीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. दोघेही खरौंधी ठाणे ग्रामपंचायत कुपा टोला दामर येथील रहिवासी आहेत.
ब्रजेश कुमार भुईया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे. माझं तिच्याशी लग्न झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. त्याचवेळी मैत्रिणीनेही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या दोघांमध्ये वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू आहे. आता आम्हाला लग्न करून एकमेकांसोबत आनंदी राहायचं असल्याचं तिने सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.