लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी बलात्कार - मुलायम सिंह
By admin | Published: July 19, 2014 04:09 PM2014-07-19T16:09:09+5:302014-07-19T16:09:28+5:30
' उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी इतकी असूनही राज्यातील बलात्काराचे प्रमाण कमी आहे' असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यांनी केले आहे.
Next
>ऑनलाइन टीम
लखनऊ, दि. १९ - 'मुलांकडून बलात्कारासारख्या चुका होऊन जातात' या वादग्रस्त वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊनही समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी बलात्काराबाबत आणखी एक खळबळजनक वक्तव्य करत नवा वाद ओढवून घेतला आहे. ' उत्तर प्रदेशची लोकसंख्या २१ कोटी इतकी असूनही राज्यातील बलात्काराचे प्रमाण कमी आहे', असे वक्तव्य मुलायम सिंह यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या काही महिन्यात बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून त्यावरून राज्य सरकारला जाब विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची पाठराखण करताना मुलायम सिंह यांनी हे विधान केले.
नुकतीच उत्तर प्रदेशात एका शिक्षिकेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्याबद्दल मुलायम सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. राज्यातील प्रचंड लोकसंख्येचा आधार घेत त्यांनी त्या तुलनेत येथे बलात्काराचे प्रमाण सर्वात कमी असल्याचा युक्तिवाद केला. तसेच प्रत्येक गुन्हा थांबवला जाऊ शकत नाही,' असेही ते म्हणाले.
यापूर्वीही मुलायम सिंह यांनी बलात्कारासंदर्भात खळबळजनक वक्तव्य केले होते.