कमी मूल्यवर्धनच भारताला मंदीपासून वाचविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:30 AM2020-04-09T05:30:39+5:302020-04-09T05:31:00+5:30
केपीएमजी कंपनीचा अहवाल
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे चीनमधील उद्योग विस्कळीत झाले असले तरी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालापेक्षा त्याचे मूल्यवर्धन बरेच कमी झाल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा त्रास जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर केपीएमजी कंपनीच्या अहवालात नमूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१९ च्या अखेरच्या तिमाहीत भारताने प्रत्येक जीडीपीचा विकास दर ४.३० टक्के नोंदविला आणि लवकरच कोरोना या साथीच्या आजाराने लॉकडाउन झाले. लॉकडाउनने प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे.
या क्षेत्रात म्हणजेच अन्न व नॉन-अल्कोहोलिक पेये (२६.३० टक्के), गृहनिर्माण, पाणी व वीज, गॅस आणि इतर इंधन (१३.७० टक्के), वाहतूक (१७.६० टक्के), इतर वस्तू आणि सेवा (१७.२० टक्के), कपडे आणि पादत्राणे (५.८० टक्के), आरोग्य (४.६० टक्के), शिक्षण (४.०० टक्के), संवाद (२.७० टक्के), अल्कोहोलिक पेय व तंबाखू यांची टक्केवारी १.९० टक्के आहे.
भारतातील ३७ टक्के अनौपचारिक कामगार बिगर कृषी क्षेत्रातून येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणाºया राज्यांमध्ये राजस्थान ५४.८० टक्के, पंजाब ५१.८० टक्के, आंध्र प्रदेश ५१ टक्के, छत्तीसगड ४९ टक्के आणि गुजरात ४८.४० टक्के असे प्रमाण आहे.
च्भारत चीनकडून सुमारे ७० अब्ज डॉलर्स किमतीचा कच्चा माल आयात करतो. प्रमुख औद्योगिक क्षेत्रे म्हणजे इलेक्ट्रिकल मशिनरी, अवजड यंत्रसामग्री आणि न्यूक्लिअर अणुभट्ट्या, सेंद्रिय रसायने, प्लॅस्टिक व खते आदी चिनी आयातीवर अवलंबून असतात. हे क्षेत्र त्यांच्या कच्च्या मालापैकी ६० ते ८२ टक्क्यांदरम्यान माल चीनमधून आयात करतात. तथापि, या कच्च्या मालामुळे भारताचे मूल्यवर्धन अन्य आशियाई देशांच्या तुलनेत २७.३० टक्केच आहे. चीनवर अवलंबून असलेल्या अन्य देशांचे मूल्यवर्धन व्हिएतनाम-४८.२० टक्के, मलेशिया-४४.६० टक्के, थायलंड-४०.४० टक्के आहे.