आजपासून एलपीजी ग्राहकांना मिळेल बँक खात्यात अनुदान
By admin | Published: January 1, 2015 02:15 AM2015-01-01T02:15:29+5:302015-01-01T02:15:29+5:30
घरगुती गॅस ग्राहकांना १ जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे. त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलिंडर घेऊ शकतील.
नवी दिल्ली : घरगुती गॅस ग्राहकांना १ जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे. त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलिंडर घेऊ शकतील.
बँक खात्यात थेट अनुदान जमा होण्याच्या योजनेचे सदस्य होताच ग्राहकाच्या बँक खात्यात ५६८ रुपये जमा होतील.
डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर स्कीम (डीबीटीएस), असे नाव असलेल्या या योजनेचे नाव ‘पहल’ (प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ), असे करण्यात आले आहे.
१४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत ७५२ रुपये असून, त्यावर ४१७ रुपयांचे अनुदान मिळेल. सिलिंडरची किंमत वेगवेगळ्या शहरांत तेथील स्थानिक संस्था करांनुसार वेगवेगळी असेल. ज्यांना ‘पहल’ योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांना बँकेत आधार कार्डचा व एलपीजी ग्राहक नंबर द्यावा लागेल किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्या ग्राहकांना एलपीजीचा १७ आकडी क्रमांक द्यावा लागेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.