Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:21 PM2020-05-01T13:21:36+5:302020-05-01T13:38:05+5:30

Gas Cylinder's New Price : सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे.

lpg gas cylinder price reduced from 1 may by oil companies during lockdown SSS | Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी खूशखबर! गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सोशल डिस्ंटसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.  सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. 

विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त झाला आहेत. दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर आणि 19 किलो सिलिंडर स्वस्त झाला आहे. 19 किलो वजनाचा सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला. दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 581.50 रुपये आहे. मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 579 रुपये झाली आहे. IOC ने  दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलिंडरचे दर 744 वरून 581 वर आले आहेत. कोलकातामध्ये हे दर 774.50 वरून 584.50, मुंबईत 714.50 वरून 579.00 तर चेन्नईत 761.50 वरून 569.50 रुपये झाले आहेत.

दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 एप्रिल रोजी 61 आणि 62 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 65 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 64.50 रुपयांनी कमी झाली होती. सध्या दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 774 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 774 रुपये, मुंबईत 714.50 आणि चेन्नईमध्ये 761.50 रुपये आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले होते. याआधी एक मार्चला गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 3 महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी बीपीएल कुटुंबीयांना तीन महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. या योजनेत बदल करण्यात आला असून, 1 ऑगस्ट 2019 पर्यंत जोडलेल्या ग्राहकांना आता याचा फायदा घेता येणार आहे. तेल कंपन्यांनी जुलै 2020 पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?

CoronaVirus News : दिलासादायक! जगभरात आतापर्यंत दहा लाख रुग्णांची झाली कोरोनातून मुक्तता!

CoronaVirus News : "...तर येत्या 3 महिन्यांत कोरोनावर लस उपलब्ध होणार"

 

Web Title: lpg gas cylinder price reduced from 1 may by oil companies during lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.