LPG gas: 'या' शहरांमध्ये LPG सिलिंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे, यादीत तुमच्या शहराचे नाव आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:06 PM2022-03-22T18:06:08+5:302022-03-22T18:07:03+5:30

LPG gas: घरगुती गॅसच्या किमती वाढण्याबरोबरच कंपन्यांनी 5 आणि 10 किलो सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे.

LPG gas: LPG cylinder price hike above Rs.1000 in these cities, is your city name in the list? | LPG gas: 'या' शहरांमध्ये LPG सिलिंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे, यादीत तुमच्या शहराचे नाव आहे का?

LPG gas: 'या' शहरांमध्ये LPG सिलिंडरचा दर 1000 रुपयांच्या पुढे, यादीत तुमच्या शहराचे नाव आहे का?

Next

नवी दिल्ली: मंगळवारी अखेर एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली. 14.2 किलोच्या सिलिंडरमागे 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच, देशातील काही शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ₹ 1000 पेक्षा जास्त झाली असून, देशातील सरासरी दर ₹ 950 झाला आहे.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, देशभरातील 11 शहरांमध्ये सिलिंडरच्या किमती 1000 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. या शहरांमध्ये मध्य प्रदेशातील भिंड, ग्वाल्हेर आणि मुरैना यांचा समावेश आहे. भिंडमध्ये ₹1031 मध्ये सिलिंडर मिळत आहे, तर ग्वाल्हेरमध्ये LPG सिलिंडरची किंमत 1033.50 रुपये झाली आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील मुरैना येथे सिलिंडर 1035 रुपयांत मिळत आहे.

या शहरांमध्ये सर्वाधिक किंमत आहे
बिहारमधील काही शहरांमध्येही सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या वर आहे. पटनामध्ये घरगुती सिलिंडरचा दर 1048 रुपये, तर भागलपूरमध्ये 1047.50 रुपये झाला आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये सिलंडरचा भाव 1046 रुपये, तर झारखंडच्या दुमकामध्ये 1007 आणि रांचीमध्ये 1007 झाला आहे.

देशातील सरासरी दर 950
तिकडे छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 1038, रायपूरमध्ये 1031, उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सिलींडरची किंमत 1019 वर गेली आहे. तसेच, आता देशातील प्रमुख शहरांमध्ये LPG सिलिंडर सरासरी दर 950 रुपये झाला आहे. दिल्लीत 949.50 रुपये, मुंबईत 949.50, कोलकात्यात 976 रुपये, जयपूरमध्ये 953.50 रुपये आणि भोपाळमध्ये 955.50 रुपये झाला आहे.

5 आणि 10 किलोचे सिलिंडर महागले
घरगुती गॅसच्या किमती वाढण्याबरोबरच तेल कंपन्यांनी 5 किलो आणि 10 किलोच्या सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. आता 5 किलोचा एलपीजी सिलिंडर 349 आणि 10 किलोचा सिलिंडर 669 रुपयांना मिळणार आहे. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: LPG gas: LPG cylinder price hike above Rs.1000 in these cities, is your city name in the list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.