LPG Price Hike: गॅस दरवाढीचा भडका; किचन बजेट कोलमडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:02 AM2022-05-08T06:02:47+5:302022-05-08T06:03:32+5:30

200 रुपयांची वाढ गेल्या वर्षभरात घरगुती गॅसच्या किमतीमध्ये झाली आहे. व्यावसायिक गॅस  सिलिंडरचे दरही चढेच

LPG Gas price hike by 50 rs per 14 kg Cylinder; kitchen budget will collapse | LPG Price Hike: गॅस दरवाढीचा भडका; किचन बजेट कोलमडणार

LPG Price Hike: गॅस दरवाढीचा भडका; किचन बजेट कोलमडणार

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची काेणतीही चिन्हे दिसत नाहीत. केंद्राने सर्वसामान्यांना घरगुती गॅस दरवाढीचा दणका दिला असून, महागाईच्या भडक्यात तेल ओतले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ सरकारने जाहीर केली. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच ठिकाणी १४.२ किलाेच्या गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम माेजावी लागणार आहे. 

गेल्या दाेन महिन्यामध्ये ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले हाेते. तर मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढविले हाेते. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९९९.५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपये झाली आहे. 

किचन बजेट कोलमडणार
n गेल्या काही दिवसापासून पेट्राेल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत. मात्र, सरकारने घरगुती गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा हलका केला आहे. 
n पेट्राेल आणि डिझेलपाठाेपाठ गॅसचे दरदेखील उच्चांकी पातळीवर आहेत. इंधनाच्या उच्चांकी दरामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती महाग झाल्या आहेत. 
n त्यातच या दरवाढीमुळे जनतेचे बजेट काेलमडणार आहे. सर्वच स्तरातून गॅस दरवाढीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसची  सिलिंडरला ‘श्रद्धांजली’
केंद्र सरकारने आजअचानकपणे घरगुती गैसच्या किंमतीत जवळपास 
५० रुपयांची 
सरसकट केलेली वाढ मागे घ्यावी, या मागणीच्या समर्थनार्थ दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेस कार्यालयात गैस सिलिंडरला हार अर्पण करून केंद्राच्या निर्णयाचा प्रतिकात्मक विरोध केला.

मोदी काळात सबसिडी बंद
यूपीएच्या काळात घरगुती गैस सिलेंडरची किंमत ४१४ एवढी होती. मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात यात ५८५ रुपयांनी वाढ केली आहे. यूपीएच्या काळात सिलेंडरवर ४६,४५८ कोटी रुपये सबसिडी दिली जात होती. आता मोदी सरकारने संपूर्ण सबसिडी बंद केली आहे. गरीब व मध्यमवर्गीयांना ४१४ रुपयांमध्ये सिलेंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खेडा यांनी यावेळी केली.

Web Title: LPG Gas price hike by 50 rs per 14 kg Cylinder; kitchen budget will collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.