Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा! जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 12:59 PM2020-10-01T12:59:11+5:302020-10-01T13:12:44+5:30

Gas Cylinder's New Price : ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर आता ऑक्टोबरमध्येही एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

lpg price in india october 2020 gas cylinder price unchanged for october | Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा! जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर

Gas Cylinder's New Price : लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा! जाणून घ्या गॅस सिलिंडरचे नवे दर

googlenewsNext

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर आता ऑक्टोबरमध्येही एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत (LPG Gas Cylinder Price ) ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी  (HPCL, BPCL, IOC) एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाही आहे. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपयांवर स्थिर असलेली पाहायला मिळत आहे. 

दिल्लीसह इतरही काही शहरांमध्ये सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. याआधी जुलैमध्ये 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमती 4 रुपयांनी वाढवण्यात आल्या. त्याच वेळी दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर जूनमध्ये 11.50 रुपयांनी महाग झाला. तर मेमध्ये तो 162.50 रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र आता देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी IOC च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये सिलिंडरच्या किमती या स्थिर आहेत. 

19 किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ

मुंबईमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये आहे. दिल्लीमध्ये14.2 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलिंडरची किंमत  594 रुपये, चेन्नईमध्ये 610 रुपये तर कोलकातामध्ये 620.50 रुपये प्रति सिलिंडर आहे. तर 19 किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1133.50 रुपयांवरून वाढून 1166 रुपये झाले आहे. यामध्ये 32 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. तसेच कोलकातामध्ये 24 रुपयांनी वाढ झाली आहे. सिलिंडरची किंमत 1196 रुपयांवरून वाढून 1220 रुपये झाली आहे. 

चेन्नईमध्ये घरगुती सिलिंडरची किंमत 1250 रुपयांवरून 1276 रुपये झाली आहे. म्हणजेच यामध्ये 26 रुपयांची वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये सिलिंडरची किंमत 24.50 रुपयांनी वाढून दर 1089 रुपयांवरून 1113.50 रुपयांवर पोहोचले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी सप्टेंबरमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर किमतीमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. तसेच तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता.

Read in English

Web Title: lpg price in india october 2020 gas cylinder price unchanged for october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.