एलपीजीच्या दरात ८६ रुपयांची वाढ
By admin | Published: March 2, 2017 09:45 AM2017-03-02T09:45:30+5:302017-03-02T09:47:23+5:30
- विनाअनुदानित एलपीजी सिलेंडदरची किंमत तब्बल ८६ रुपयांनी वाढवण्यात आली असल्यामुळे आता प्रति सिलेंडरसाठी ७३७.५० रुपये मोजावे लागतील.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - विनाअनुदानित एलपीजी सिलेंडदरची किंमत तब्बल ८६ रुपयांनी वाढवण्यात आली असल्यामुळे आता प्रति सिलेंडरसाठी ७३७.५० रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात आत्तापर्यंत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सिलेंडरचे दर वधारल्याने भारतातही सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी गॅस सिलेंडरचे दर 66.50 रुपयांनी वधारले होते.
त्यामुळे ज्या ग्राहकांचा वर्षभराचा १२ अनुदानित सिलेंडरचा कोटा पूर्ण झाला आहे आणि ज्यांनी अनुजदान सोडले आहे अशा लोकांना या दरवाढीचा फटका बसणार असून त्यांन एका सिलेंडरसाठी ७३७ रुपये मोजावे लागतील. दरवाढीपूर्वी 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरसाठी 650.50 रुपये मोजावे लागत आहे, मात्र आता दर ८६ रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.