अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:42 IST2024-12-20T12:42:04+5:302024-12-20T12:42:24+5:30

जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो.

lpg truck took u turn and hit from behind fire all around cctv footage of jaipur fire incident | अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

अग्निकल्लोळ! LPG ट्रकचा यू-टर्न, मागून दुसऱ्याने दिली धडक; ८ जणांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

जयपूरमधील भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. एलपीजी ट्रक यू-टर्न घेत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याच दरम्यान मागून एक ट्रक येतो, जो एलपीजी ट्रकला जोरदार धडकतो. धडकेमुळे एलपीजी ट्रकचं नोजल तुटतं आणि गॅस गळती सुरू होते. गॅस गळती झाल्यानंतर काही सेकंदात मोठा स्फोट होतो आणि सर्वत्र आग दिसते.

राजस्थानच्या जयपूरमध्ये आज (२० डिसेंबर) सकाळी ६ वाजता एक भीषण अपघात झाला आहे. येथे एका ट्रकची दुसऱ्या एलपीजी ट्रकला धडक बसली. या धडकेनंतर एलपीजी ट्रकला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर जवळपास उभ्या असलेल्या ४० वाहनांनाही आग लागली. आग एवढी भीषण होती की ५ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ३५ हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ५० टक्क्यांहून अधिक लोक असे आहेत ज्यांचं शरीर अपघातात ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजलं आहे. 
 
गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर जयपूरमधील सवाई मान सिंग (एसएमएस) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
 

Web Title: lpg truck took u turn and hit from behind fire all around cctv footage of jaipur fire incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.