L&T ला मिळालं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं २,५०० कोटींचं कंत्राट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 17:26 IST2021-01-29T17:24:31+5:302021-01-29T17:26:58+5:30
आज कंपनीनं शेअर बाजाराला यासंबंधी दिली माहिती

L&T ला मिळालं मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं २,५०० कोटींचं कंत्राट
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोअर योजनेअंतर्गत (बुलेट ट्रेन) लार्सन अँड टुब्रो या कंपनीला २,५०० कोटी रूपयांचं कंत्राट देण्यात आलं आहे. शुक्रवारी लार्सन अँड टुब्रोनं यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, कंपनीनं आपल्याला किती कोटींचं कंत्राट मिळालं आहे याची माहिती दिली नाही. परंतु या श्रेणीतील कंत्राटं १ हजार कोटी रूपयांपासून २,५०० कोटी रूपयांपर्यंत असतात.
"एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पायाभूत सुविधा उभारणी व्यवसायाला मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोअरचं मह्त्त्वपूर्ण कंत्राट मिळालं आहे. या अंतर्गत २८ पुलांची खेरीदी, रंग आणि परिवहनाचं काम मिळालं आहे. जपानच्या IHI Infrastructure Systems (IIS) सोबत कंसोर्टिअमद्वारे कंपनीनं हे कंत्राट मिळालं आहे," अशी माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली.
५०८ कि.मी.चा रेल्वेमार्ग
५०८ कि.मी.चा मुंबई ते अहमदाबाददरम्यान हा बुलेट ट्रेन प्रकल्प असून, त्यासाठी जलदगती रेल्वेमार्ग बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी ८० टक्के रक्कम भारतानेजपानकडून ०.१ टक्का व्याजावर कर्जाऊ घेतली आहे. ही रक्कम १५ वर्षांत फेडावयाची आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी १५५.७७ किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात, ३४८.०४ किलोमीटर गुजरात तर ४.३ किलोमीटरचा भाग दादरा नगर हवेली या ठिकाणी आहे. २०२२ साली ७५ व्या स्वातंत्र्यदिनी या बुलेट ट्रेनच्या मार्गावरील एका भागाचे तरी उद्घाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठरविले होते, पण आता ते साध्य होणार नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.