LTTE Leader Alive: LTTE प्रमुख प्रभाकरण जिवंत, लवकरच बाहेर येणार; तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:37 PM2023-02-13T14:37:47+5:302023-02-13T14:39:39+5:30

LTTE Leader Prabhakaran: तामिळनाडुच्या तंजावरमध्ये वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिल्सचे अध्यक्ष पी नेदुमारनने हा दावा केला आहे.

LTTE Leader Alive: LTTE chief Prabhakaran alive, out soon, Tamil leader's claim | LTTE Leader Alive: LTTE प्रमुख प्रभाकरण जिवंत, लवकरच बाहेर येणार; तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

LTTE Leader Alive: LTTE प्रमुख प्रभाकरण जिवंत, लवकरच बाहेर येणार; तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

googlenewsNext


LTTE Leader Prabhakaran Alive: दिवंगत माजी पंतप्रधान राजी गांधी यांच्या हत्येतील सूत्रधार LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचा अध्यक्ष पी नेदुमारन याने तमिळनाडूच्या तंजावरमध्ये एक निवेदन जारी करुन प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा केला आहे. 2009 मध्ये श्रीलंकन ​​लष्कराच्या कारवाईदरम्यान प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले होते.

नेदुमारन म्हणाला, तामिळ राष्ट्रीय नेता प्रभाकरन जिवंत असल्याची पुष्टी मी करतोय. प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संमतीनेच हा खुलासा करत असल्याचेही त्याने सांगितले. लिट्टे प्रमुख जिवंत असून, तो एकदम ठणठणीत असल्याचा दावा नेदुमारन याने केला. तसेच, तो लवकरच बाहेर येईल आणि तामिळ लोकांसाठी नवीन योजना जाहीर करेल, असेही नेदुमारन म्हणाला.

'प्रभाकरन बाहेर येण्याची योग्य वेळ'
तंजावर येथील मुल्लिवाइक्कल मेमोरिअल येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना नेदुमारन म्हणाला की, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि श्रीलंकेतील राजपक्षे राजवटीविरुद्ध सिंहली लोकांचे शक्तिशाली बंड पाहता प्रभाकरनला बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. यासोबतच नेदुमारन याने इलम तमिळ (श्रीलंकन ​​तमिळ) आणि जगभरातील तमिळांना प्रभाकरनला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले. तमिळनाडू सरकार, पक्ष आणि तामिळनाडूच्या जनतेला प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्याने केले.

LTTE नेत्याचा संमतीचा दावा
एका प्रश्नाला उत्तर देताना नेदुमारन म्हणाला की, तो प्रभाकरनच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे आणि त्यांनीच प्रभाकरनविषयी माहिती दिली आहे. ही माहिती जाहीर करण्यासाठी लिट्टे नेत्याची संमती मिळाल्याचा दावाही त्याने केला. रिपोर्टनुसार, प्रभाकरनचा मृत्यू 18 मे 2009 रोजी झाला होता. श्रीलंकन ​​सैन्याने त्याला चारही बाजूंनी घेरल्यानंतर त्याने 300 एलटीटीई समर्थकांसह आत्महत्या केली होती. दुसऱ्या एका अहवालात श्रीलंकन ​​सैन्याने केलेल्या हल्ल्यात तो मारला गेल्याचे म्हटले आहे. आता नेदुमारनच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

या गुन्ह्यांमध्ये प्रभाकरनचा हात
लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) चा संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरन हा ओसामा बिन लादेनपेक्षा कमी नव्हता. प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा केल्यावर 21 मे रोजी श्रीलंकेचा जाफना प्रदेश LTTE दहशतवादापासून मुक्त झाला. प्रभाकरनच्या मृत्यूनंतर एलटीटीईचाही पराभव झाला. प्रभाकरन माजी पंतप्रधानांची हत्या, श्रीलंकेच्या दुसर्‍या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा प्रयत्न, शेकडो राजकीय हत्या, पंचवीस आत्मघाती हल्ले आणि हजारो लोकांसह सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार आहे.

Web Title: LTTE Leader Alive: LTTE chief Prabhakaran alive, out soon, Tamil leader's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.