योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:32 AM2022-04-26T08:32:40+5:302022-04-26T08:34:02+5:30

उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे.

lucknow adg law and order prashant kumar reaction on loudspeaker action and security for alvida namaz | योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले!

योगींचा एक आदेश अन् १७ हजार ठिकाणी 'आवाज' झाला कमी, लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले!

Next

लखनौ-

उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला आहे. यासोबतच १२५ ठिकाणी लाऊडस्पीकर आणि भोंगे हटविण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजींनी याबाबतची माहिती दिली आहे. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर कोर्टाच्या निर्णयाचे राज्यात पालन केलं जात आहे, असं पोलीस अधिकारी म्हणाले. 

कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात १२५ ठिकाणी लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. १७ हजार ठिकाणी लोकांनी स्वत:हून भोंगे आणि लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. नमाज पठणासंदर्भात सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली जात आहे. तसंच शांती समितीची बैठक देखील झाली आहे. 

राज्यात ३७ हजार धर्मगुरूंशी झाली चर्चा
प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार राज्यात जवळपास ३७ हजार ३४४ धर्मगुरूंसोबत चर्चा झाली आहे. ३१ हजार जागांवर अलविदा नमाज अदा केली जाणार आहे. याशिवाय ७५०० ईदगाह आणि २० हजार मशिदींमध्ये नमाज अदा केली जाणार आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून ४८ कंपन्या पीएसी, ७ कंपनी केंद्रीय निम्नसैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील लाऊडस्पीकर हटवले
देशात धार्मिक सलोख्याचं उदाहरण ठेवत नुकतंच श्री कृष्ण जन्मभूमीमधील लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. येथील मंदिर परिसरातील भागवत भवनच्या कळसावर लाऊडस्पीकर आहेत. त्यावर दिवसभरात जवळपास एक ते दीड तास मंगलाचरण आणि विष्णू सहस्त्रनाम वाजवण्यात येत असे. यानंच दिवसाची सुरुवात होत असे. आता ते थांबविण्यात आलं आहे. 

गोरखनाथ मंदिरातही 'आवाज' कमी
गोरखनाथ मंदिर परिसरातील लाऊडस्पीकरचाही आवाज कमी करण्यात आला आहे. यासोबतच कानपूर, लखनौ, नोएडा आणि इतर शहरांमध्येही धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले स्पीकर हटविण्यात आले आहेत किंवा आवाज कमी करण्यात आला आहे. 

परवानगीविना मिरवणूक, जुलूस चालणार नाही
राज्यातील सर्व धार्मिक आयोजनांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर शांतता कायम ठेवण्यासाठी परवानगीविना कुणालाही जुलूस किंवा मिरवणूक काढता येणार नाही. तसंच धार्मिक कार्यक्रमावेळी अशा स्थळांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश सरकारनं दिले आहेत.

Web Title: lucknow adg law and order prashant kumar reaction on loudspeaker action and security for alvida namaz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.