अलाहाबाद युनिव्हर्सिटीत जाणाऱ्या अखिलेशना योगी सरकारनं अडवलं, लखनऊ विमानतळावर गोंधळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 04:29 PM2019-02-12T16:29:42+5:302019-02-12T16:29:53+5:30

अलाहाबाद युनिव्हर्सिटीतल्या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना योगी सरकारनं लखनऊ एअरपोर्टवर अडवलं.

lucknow administration stopped akhilesh yadav at airport who were going to attend allahabad university | अलाहाबाद युनिव्हर्सिटीत जाणाऱ्या अखिलेशना योगी सरकारनं अडवलं, लखनऊ विमानतळावर गोंधळ  

अलाहाबाद युनिव्हर्सिटीत जाणाऱ्या अखिलेशना योगी सरकारनं अडवलं, लखनऊ विमानतळावर गोंधळ  

Next

लखनऊः अलाहाबाद युनिव्हर्सिटीतल्या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना योगी सरकारनं लखनऊ एअरपोर्टवर अडवलं. अखिलेश यादव यांना अडवल्यानंतर एअरपोर्ट पोलीस, प्रशासन आणि समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. अखिलेश यांनी ट्विट केल्यानंतर लागलीच त्यांचे कार्यकर्ते लखनऊ एअरपोर्टवर दाखल झाले. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले, प्रयागराजमध्ये कायदा-सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून अखिलेश यांना अडवण्यात आलं आहे.

अखिलेश यादव यांना लखनऊ एअरपोर्टवर अडवण्यात आल्यानंतर अलाहाबाद युनिव्हर्सिटीतही तणावाचं वातावरण आहे. विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांकडून युनिव्हर्सिटीमध्ये गोंधळ घातला जात असल्यानं पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. अखिलेशनं ट्विट करत म्हटलं की, एका विद्यार्थी नेत्याच्या शपथग्रहण कार्यक्रमात सरकार एवढी का घाबरत आहे. त्यासाठी मला लखनऊ एअरपोर्टवर अडवण्यात आलं आहे. अलाहाबाद युनिव्हर्सिटीत मंगळवारी विद्यार्थी संघाचं उद्घाटन समारोह होणार आहे.





अखिलेश या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालेच होते. ते लखनऊ एअरपोर्टवर पोहोचले, त्यानंतर त्यांना विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. यादरम्यानच पोलीस आणि प्रशासन अधिकारी एअरपोर्ट तैनात होते.
अखिलेश यादव आले असता त्यांना विमानात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. अखिलेशला योगी सरकारनं लखनऊ एअरपोर्टवर अडवल्यानं मायावतींनीही भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Web Title: lucknow administration stopped akhilesh yadav at airport who were going to attend allahabad university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.