लखनऊ चकमक अखेर संपली, एका दहशतवाद्याचा खात्मा

By admin | Published: March 8, 2017 04:00 AM2017-03-08T04:00:36+5:302017-03-08T04:11:36+5:30

ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये घुसलेल्या संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेल्या 11 तासांपासून सुरु असलेली चकमक अखेर संपली.

The Lucknow blast finally ended, the death of a terrorist | लखनऊ चकमक अखेर संपली, एका दहशतवाद्याचा खात्मा

लखनऊ चकमक अखेर संपली, एका दहशतवाद्याचा खात्मा

Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 08 -  येथील ठाकूरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये घुसलेल्या संशयित दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेल्या 11 तासांपासून सुरु असलेली चकमक अखेर संपली. एटीएसच्या पथकाने या ठिकाणी लपून बसलेल्या एका संशयित इसिसच्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. 
हाजी कॉलनीमध्ये गेल्या अकरा तासांपासून पोलिसांसह एटीएसचे पथक आणि दहशतवादी यांच्यात अंदाधुंद गोळीबार सुरू होता. यावेळी दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याच्या उद्देशाने पोलिसांचे ऑपरेशन सुरू होते. मात्र, या ठिकाणी झालेल्या चकमकीत सैफुल्लाह या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. सुरुवातीला आणखी दोन दहशतवादी येथील एका घरात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. मात्र, घरात गेल्यानंतर फक्त सैफुल्लाह हा एकच दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. 
दरम्यान, येथील चकमक थांबविण्यात आली असल्याच्या वृत्ताला अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, या ठिकाणी सुरु असलेले ऑपरेशन थांबविण्यात आले असून एका संशयित दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. 
याचबरोबर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी इसिस या दहशतवादी संघटनेचा संबंध असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: The Lucknow blast finally ended, the death of a terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.