आता लखनऊ शहराचे नाव बदलणार? योगींच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चेला उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:50 PM2022-05-17T13:50:27+5:302022-05-17T13:51:37+5:30

Lucknow City New Name : योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच अशी भाषा वापरण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या भाषेचे वेगवेगळे अर्थ आहेत. 

Lucknow City Name May Be Changed, After Yogi Tweet, There Was A Discussion | आता लखनऊ शहराचे नाव बदलणार? योगींच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चेला उधाण!

आता लखनऊ शहराचे नाव बदलणार? योगींच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चेला उधाण!

Next

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ट्विटमुळे राजधानी लखनऊचे नाव बदलले (Lucknow City New Name) जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटमध्ये पहिल्यांदाच अशी भाषा वापरण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या भाषेचे वेगवेगळे अर्थ आहेत. 

'शेषावतार भगवान लक्ष्मणजींचे पवित्र शहर लखनऊमध्ये आपले स्वागत आहे', असे ट्विट सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर हँडलने केले आहे. अमौसी विमानतळावर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना काढलेले फोटो टॅग करत हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमुळे लखनऊचे नाव लक्ष्मणजींच्या नावावर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्याचे हे ट्विट सामान्य स्वागत ट्विट असल्याचे दिसते. मग लखनऊचे नाव बदलण्याच्या चर्चांमागील कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक लोक हे ट्विट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केल्यामुळे नाव बदलण्याचे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, याआधी लखनऊचे नाव बदलून लखनपुरी, लक्ष्मणपुरी आणि लखनपूर करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती, त्यामुळे नाव बदलण्याचा असाही अंदाज वर्तवला जात आहे.

विशेष म्हणजे,  2017 मध्ये उत्तर प्रदेशात सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या काळात मुगलसराय स्टेशनचे नाव बदलण्यात आले. योगी सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये मुघलसराय स्टेशनचे नाव हे पंडित दीनदयाल उपाध्याय स्टेशन असे करण्यात आले.

एवढेच नाही तर योगी मंत्रिमंडळाने मुगलसराय तहसीलचे नावही बदलले. योगी मंत्रिमंडळाने तहसीलचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय तहसील केले. यासोबतच योगी सरकारने फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले. म्हणजेच ज्या फैजाबाद जिल्ह्याच्या अंतर्गत अयोध्या शहर आले, त्याचे स्वरूप बदलून संपूर्ण जिल्हा अयोध्या करण्यात आला.

Web Title: Lucknow City Name May Be Changed, After Yogi Tweet, There Was A Discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.