धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 08:38 PM2018-10-27T20:38:00+5:302018-10-27T20:50:55+5:30

साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या रक्त बाटल्यांमधील काळ्या बाजाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर, रक्ताच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक

lucknow-fake-blood-was-made-by-mixing-saline-water-was-supplied-across-the-city | धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ

धक्कादायक! सलाईनमिश्रित रक्त बाटल्यांची होतेय विक्री, रुग्णांच्या जीवाशी खेळ

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजधानी लखनौ येथे नकली रक्ताच्या बाटल्या मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून येथे सलाईनच्या बाटल्यातील खारे पानी वापरुन रक्ताच्या बाटल्या बनिवण्याचा काळा बाजार करण्यात येत होतात. याप्रकरणी एटीएसने 5 जणांना अटक केली आहे. 
रक्ताच्या बाटल्यांचा काळा बाजार करुन या आरोपींनी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. आत्तापर्यंत जवळपास 1 हजारपेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या विकल्या आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणात शहरातील अनेक ब्लड बँक आणि पथॉलजी लॅबमधील कर्मचारी जोडले गेले आहेत. एटीएसने महत्वाचा सुगावा हाती लागल्यानंतर एफएसडीएच्या मदतीने ब्लड बँकांविरुद्ध तपास सुरू केला आहे. 

एसएसपी एटीएफ अभिषेक कुमार सिंह यांनी सांगितले की, साधारण दोन महिन्यांपूर्वी शहरात होणाऱ्या रक्त बाटल्यांमधील काळ्या बाजाराची माहिती मिळाली होती. त्यानंतर, रक्ताच्या बाटल्या विकणाऱ्या अनेक नशाबाजांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी, त्रिवेणीनगर येथील एका फ्लॅटमध्ये रक्ताचा काळा बाजार चालत असल्याचे समजले. त्यानुसार गुरुवारी रात्री याप्रकरणाचा मास्टरमाईंड मोहम्मद नसीमच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा, फ्लॅटमध्ये सलाईनच्या बाटल्यांतून तयार करण्यात रक्ताच्या बाटल्या, रक्ताच्या बॅग, रॅपर आणि अन्य सामाना जप्त करण्यात आले. तर, मोहम्मदसह त्याच्या आणखी 5 साथीदारांना अटक करण्यात आली आहे. 

ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग

पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. याप्रकरणात निराला बीएनके ब्लड बँकेतील लॅब टेक्निशियन राघवेंद्र प्रताप आणि लॅब असिस्टंट पंकज त्रिपाठी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, रिक्षाचालक आणि नेशबाजांना या रक्ताच्या बाटल्या विकण्याचे काम देण्यात आले होते. रक्तदात्यांना 500 ते 1000 रुपये देऊन त्यांच्याकडून हे रक्त खरेदी करण्यात येत होते. त्यानंतर, 2 ते 4 हजार रुपयांत या मिलावटी रक्त बाटल्यांची विक्री होत होती. गरीब आणि गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात फसवून हे रक्त विकले जाई. 

तज्ज्ञांनी वर्तवला धोका

याप्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर एसटीएफने अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधला. तज्ज्ञांच्या मतानुसार, या रक्ताच्या बाटल्यात सलाईनचे पाणी मिळसल्याने आरबीसी ब्रोकेने (हिमोलाईज्ड) होते. त्यामुळे रुग्णाले या बाटलीतील रक्त चढवल्यानंतर रुग्णाला ह्रदयविकाचा झटका येऊ शकतो. विशेष म्हणजे, कुठल्याही तपासणीशिवाय रक्त चढवल्यास, एचआयव्ही आणि कावीळ यासारख्या जीवघेणे रोगही उद्भवू शकतात, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.    


 

Web Title: lucknow-fake-blood-was-made-by-mixing-saline-water-was-supplied-across-the-city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.