लखनऊ चकमक : बदला घेण्यासाठी इसिसच्या टार्गेटवर दिल्ली?

By admin | Published: March 10, 2017 03:05 PM2017-03-10T15:05:54+5:302017-03-10T15:09:46+5:30

लखनऊ चकमकीचा बदला घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून (इसिस) आता राजधानी नवी दिल्लीला टार्गेट करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Lucknow flick: Delhi on its quest for revenge? | लखनऊ चकमक : बदला घेण्यासाठी इसिसच्या टार्गेटवर दिल्ली?

लखनऊ चकमक : बदला घेण्यासाठी इसिसच्या टार्गेटवर दिल्ली?

Next

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - लखनऊ चकमकीचा बदला घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटकडून (इसिस) आता राजधानी नवी दिल्लीला टार्गेट करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरक्षा यंत्रणांकडून हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याचा धोका लक्षात घेता गर्दीची ठिकाणी आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 
 
गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीमध्ये येणा-या जाणा-या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.  दुसरीकडे पटेल नगर मेट्रो स्टेशनवर बेवारस बॅग आढळल्यानं लोकांमध्ये काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, दहशतवादीविरोधी पथकाला कारवाई करण्याचे संकेत मिळताच वेळ न घालवता त्वरित कारवाई करावी, असे आदेश देण्यात आलेत.
(पठाणकोट, उरीनंतरही संरक्षण मंत्रालय बेफिकीर)
 
विशेष पथकाकडून जामा मशिद, जुनी दिल्ली परिसरासहीत सर्व हॉटेलमधील हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त रेल्वे पोलीस सर्व स्टेशनवरील हालचालींवर पाळत ठेवून आहेत. गुरुवारी सकाळी दिल्लीमध्ये दोन संशयित दहशतवादी वावरत असल्याच्या बातमीमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र दुपारपर्यंत ISच्या खुरासान मॉड्युलसोबत संपर्कात असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतल्यानंतर तणाव थोडासा निवळला. अटक करण्यात आलेले दोघंही शस्त्रं पुरवठा करणारे असल्याची माहिती आहे. 
 
(अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीनने उतरवले शक्तीशाली J-20)
या घडामोडीनंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष करुन धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.वाहतूक पोलीसही वर्दळीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करत आहेत. पोलीस चौक्यांनीही आपल्या-आपल्या परिसरात गस्त वाढवली आहे. दुतावास, बस स्टॉप, मेट्रो स्टेशन आणि अन्य सार्वजनिक स्थळांवर सुरक्षा यंत्रणा करडी नजर ठेवून आहेत.  
 
7 मार्च रोजी लखनऊमध्ये ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनी येथील एका घरात मध्य प्रदेशातील स्फोटाशी संबंधित दहशतवादी लपून बसला होता. यावेळी एटीएससोबत झालेल्या चकमकीत संशयित दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरियाचा (इसिस) संशयित दहशतवादी सैफुल्ला तब्बल 12 तासांच्या कारवाईनंतर मारला गेला.  
 
दरम्यान, सैफुल्लाच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला. 'जो देशाचा झाला नाही, तो माझा कसा होईल? भारताच्या सुरक्षिततेवर हल्ला चढवणारा माझा मुलगा असूच शकत नाही. अशा गद्दाराशी माझे नातेच नाही. सैफुल्लाला अल्लाही माफ करणार नाही. त्याच्या मृतदेहाचा चेहरा पाहण्याची आमची इच्छा नाही. त्याचा मृतदेह आम्हाला नको, असा निर्णय माझ्या कुटुंबाने घेतला आहे', अशी भूमिका त्याचे वडील सरताज यांनी घेतली. 

Web Title: Lucknow flick: Delhi on its quest for revenge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.