लखनऊ चकमक : लाईव्ह अपडेट्सवर गृहमंत्रालय नाराज

By admin | Published: March 9, 2017 08:29 AM2017-03-09T08:29:42+5:302017-03-09T11:23:59+5:30

लखनऊमधील ठाकूरगंज येथे संशयित दहशतवाद्यासोबतच्या चकमकीदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखवलेल्या बेजबाबदारपणावर गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

Lucknow Flint: Home Ministry angry on live updates | लखनऊ चकमक : लाईव्ह अपडेट्सवर गृहमंत्रालय नाराज

लखनऊ चकमक : लाईव्ह अपडेट्सवर गृहमंत्रालय नाराज

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 - लखनऊमधील ठाकूरगंज येथे संशयित दहशतवाद्यासोबतच्या चकमकीदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी ठेवलेल्या बेजबाबदार दृष्टीकोनावर गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलिसांकडून प्रसिद्ध माध्यमांना ऑपरेशनबाबत लाईव्ह अपडेट्स देण्याबाबत गृहमंत्रालयाने आक्षेप नोंदवला आहे. 
 
वरिष्ठ अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सर्व राज्यांतील डीजी, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांनी 26/11 हल्ल्यानंतर अशा प्रकारेच्या ऑपरेशनसाठी  मार्गदर्शक तत्त्व आखण्यात आली होती. मात्र ठाकूरगंज ऑपरेशनमध्ये पोलीस अधिका-यांनी ठरवून देण्यात आलेल्या तत्त्वांचं पालन केले नाही.  
  
मंगळवारी लखनऊ येथे संशयित दहशतवादी सैफुल्ला आणि एटीएसमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान काही वरिष्ठ अधिका-या टीव्ही चॅनेल्सना कारवाईबाबतचे त्वरित अपडेट्स दिले. यावर गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे. 
(जम्मू-काश्मीरमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक)
 
इंडियन मुजाहिद्दीन की इसिस?
दरम्यान, तपास अधिकार या घटनेमागे इसिसचा हात असल्याचा दावा करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत ज्या पद्धतीने बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे, ती पद्धत इंडियन मुजाहिद्दीन (IM) या दहशतवादी संघटनेशी मिळतजुळती आहे. यावरुन, इंडियन मुजाहिद्दीन व इसिस देशात संयुक्तरित्या घातपात घडवण्यासाठी एकत्र आलेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. गेल्या वर्षी  बंगळुरू चर्चमध्ये झालेल्या स्फोटाचेही संबंध इसिससोबत जोडण्यात आले होते. मात्र तपासणीदरम्यान स्फोटामागे सिमीचे दहशतवादी असल्याचे समोर आले. 
दरम्यान,  उत्तर प्रदेशात संशयित दहशतवाद्यांना पकडलं असून, लखनऊमध्ये दहशतवादी सैफुल्लाचाही एटीएसनं खात्मा केला आहे. त्यानंतर सैफुल्लासह संशयित दहशतवाद्यांचा इसिसशी संबंध नसल्याचं उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक दलजित चौधरी यांनी सांगितलं आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती उघड केली आहे.
 
संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसचे साहित्य वाचत होते आणि त्यामुळेच ते प्रभावित झाले. आमच्याकडे त्यांचा इसिसशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र दहशतवादी हे इसिसचं साहित्य वाचत असून, त्यापासून ते प्रेरित झाले होते. तसेच ते स्वतःचं मॉड्युल बनवण्यासाठी प्रयत्नशील होते. सैफुल्लाला भाऊ आणि शेजा-यांच्या मदतीनं आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आत्मसमर्पण करण्यास त्यानं नकार दिला. त्यानंतर आम्हाला सैफुल्लाच्या खोलीत प्रवेश करावा लागला आणि गोळीबारात तो ठार झाला, असेही चौधरी यांनी सांगितले.
 
शहरात हाय अॅलर्ट जारी
भोपाळमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लखनऊसहीत उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणांहून संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व विमानतळांवर संशयित लोकं आणि हालचालींवर तपास यंत्रणा नजर ठेऊन आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊ एनकाउन्टर आणि इसिससंबंधी घटनाक्रमाबाबत संसदेत निवेदन देणार आहेत. 
 
 

Web Title: Lucknow Flint: Home Ministry angry on live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.