योगी सरकार मोठा निर्णय घेणार! माफिया अतिक अहमदने बळकावलेल्या जमिनी परत देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 04:34 PM2023-04-22T16:34:29+5:302023-04-22T17:13:53+5:30
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी लखनौ ते प्रयागराजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या होत्या.
माफिया अतिक अहमदच्या ताब्यातील जमीन लोकांना परत करता येईल का यावर योगी सरकार विचारमंथन करत आहे. यासाठी राज्य सरकार एक आयोग स्थापन करणार असून, त्यांच्या अहवालावरून ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. माफिया अतीक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी प्रयागराजसह अनेक शहरांमध्ये दादागिरी करून जमिनी बळकावल्या होत्या किंवा त्या लोकांकडून कवडीमोल भावाने घेतल्या होत्या.
"मी मुख्यमंत्री झालो तर अमूल दूध खरेदी करू नका असं कर्नाटकच्या लोकांना सांगेन"
माफियांच्या ताब्यातील जागा खुणा करून त्या लोकांना परत करण्याचा विचार केला जात आहे. योगी सरकार याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर पोलिसांच्या चकरा मारणार्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. त्यादृष्टीने अधिकारी आराखडा तयार करत आहेत.
१३ एप्रिल रोजी यूपी एसटीएफने अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याला चकमकीत ठार केले. त्याच दिवशी, यूपी प्रशासनाकडून एक आकडा जारी करण्यात आला, ज्यामध्ये अतीक अहमदने जबरदस्तीने किती संपत्ती जमा केली होती, हे दर्शविते, कारण दहावी नापास झालेल्या अतिक अहमदला एवढी संपत्ती कशी आणि कुठून मिळाली?
गेल्या २ वर्षांपासून अतिक अहमदच्या बेकायदेशीर मालमत्तांवर योगी सरकारचा बुलडोझर चालू आहे, तरीही खोदकाम सुरू आहे. अतिक अहमदचा काळा पैसा अनेक शहरांमध्ये सापडला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, १३ एप्रिलपर्यंत अतीक अहमदकडून सुमारे ११६९ कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती मुक्त करण्यात आली आहे, तर अनेक शहरांमध्ये अजूनही छापेमारी सुरू आहे. अशा स्थितीत आगामी काळात आणखी खुलासे होऊ शकतात. आणि दरम्यान, आता हळूहळू अतिकचा छळ करणारे लोकही समोर येत आहेत. यूपी सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, प्रशासनाने अतिक अहमदची ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे, तर ७५२ कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यात आली आहे. एकूण ११६९ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर संपत्तीचा आतापर्यंत खुलासा करण्यात आला आहे.