'त्या' अपघाताने आयुष्य बदललं; सायकलस्वारांसाठी खुशी ठरतेय देवदूत, डोळे पाणावणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 11:51 AM2024-01-12T11:51:26+5:302024-01-12T11:51:51+5:30

खुशीच्या आयुष्यात एक हृदयद्रावक घटना घडली. एका अपघाताने तिचं आयुष्यच बदलून गेलं.

lucknow khushi pandey installing free lights on cycles last five years | 'त्या' अपघाताने आयुष्य बदललं; सायकलस्वारांसाठी खुशी ठरतेय देवदूत, डोळे पाणावणारी गोष्ट

'त्या' अपघाताने आयुष्य बदललं; सायकलस्वारांसाठी खुशी ठरतेय देवदूत, डोळे पाणावणारी गोष्ट

कडाक्याच्या थंडीत आणि धुक्यात बहुतेक लोक आपापल्या घरात बसतात. शक्यतो बाहेर जाणं टाळतात. मात्र याच दरम्यान 23 वर्षांची खुशी पांडे 'सायकलवर लाईट लावा' असा मेसेज असलेले पोस्टर घेऊन लखनौच्या रस्त्यावर उभी असलेली दिसते. ती सायकलवरून जाणार्‍या लोकांना थांबवते आणि नंतर त्यांच्या सायकलला बँक लाईट लावते. 

खुशीच्या आयुष्यात एक हृदयद्रावक घटना घडली. एका अपघाताने तिचं आयुष्यच बदलून गेलं. रात्री घरी परतत असताना खुशीच्या आजोबांच्या सायकलला कारने धडक दिली. सायकलला रेड लाईट नसल्याने हा अपघात झाला होता. या अपघातामुळे खुशी इतकी दुखावली गेली की तिने सायकलस्वारांचा जीव वाचवण्यासाठी बॅक लाईट लावायला सुरुवात केली.

गेल्या सहा वर्षांपासून लोकांचा जीव वाचवण्याच्या मिशन खुशीने हाती घेतलं आहे. खुशीने आतापर्यंत दीड हजारांहून अधिक सायकलवर रेड लाईट लावले आहेत. आपला अनुभव सांगताना खुशी म्हणाली, आधी लोकांना वाटलं की ती यासाठी पैसे घेईल, पण जेव्हा तिने त्यामागची गोष्ट सांगितली आणि ती मोफत असल्याचे सांगितले तेव्हा लोकांनी तिला खूप आशीर्वाद दिले.

काही अपघातामुळे आपण खचतो, तर काही आपल्या आयुष्याची दिशा बदलतात. खुशी पांडेने यानंतर अनोखं पाऊल उचललं आहे. तिच्यासोबत घडलेला अपघात इतर कुणासोबत घडू नये यासाठी आवश्यक ती योग्य ती खबरदारी घेते. खुशी लखनौच्या आलमबागमध्ये दररोज वेगवेगळ्या रस्त्यांवर उभी राहून लाईट लावते.
 

Web Title: lucknow khushi pandey installing free lights on cycles last five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.