बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:05 PM2020-09-04T12:05:24+5:302020-09-04T12:08:09+5:30
मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांवर रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीयांवर रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची वेळ आली आहे. उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काही कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर मृतदेह हा रुग्णांच्या नातेवाईकांना सोपवण्यात येतो. त्यामुळेच मुलाचे नातेवाईक हे पोलीस येण्याची वाट पाहत होते. याच दरम्यान मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे रुग्णालयाबाहेर पावसात भिजत त्यांना पोलिसांची वाट पाहावी लागली. मात्र पोलीस आलेच नाहीत.
बिल भरल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याची दिली माहिती https://t.co/ZobfQ6eUJg#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2020
मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांना अनेकदा कायदेशीर कारवाई पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र सूचना दिल्यानंतरही पोलीस रात्रभर आलेच नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यामुळे रात्रभर मृतदेहासोबत मुसळधार पावसात कुटुंबीय बसून राहिले. सूचना दिल्यानंतरही पोलीस आलेच नाहीत. यासोबतच आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे. आरोग्य विभागाने मृतदेह शवगृहात न ठेवता रात्रभर रुग्णालयाबाहेरील शेडच्या खाली ठेवला.
जीतू असं 26 वर्षीय तरुणाचं नाव होतं. मात्र डॉक्टरांनी जीतूची गंभीर प्रकृती पाहून त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सूचना दिल्यानंतर ते कायदेशीर कारवाईसाठी रुग्णालयात आले नाहीत. त्यामुळे रात्रभर जीतूचे कुटुंबीय त्याच्या मृतदेहासोबत पावसात भिजत राहिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ऑनलाईन मागवला कॅमेरा अन्...; Video पाहून बसेल धक्काhttps://t.co/gpnE88tYqj#Amazon#onlineshopping
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी
रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू
धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर
सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...