Lucknow: आता लखनौचं नाव बदलणार?, योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्वीटनं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 08:52 AM2022-05-17T08:52:34+5:302022-05-17T08:54:36+5:30
Lucknow Name Change: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका ट्वीटनं लखनौचं नाव बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Lucknow Name Change Prediction after CM Yogi Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगी सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या क्षेत्रात जास्तीत जास्त वेळ देण्याच्या सूचना दिल्या. असं असलं तरी सर्वाधिक चर्चा ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्वीटची होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी त्यांनी एक ट्वीट केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनौला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत (Yogi Adityanath welcomes PM Narendra Modi) केलं. तसंच त्यांनी एक फोटोही शेअर केला. यामध्ये त्यांनी शेषावतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या पावन नगरी लखनऊमध्ये तुमचं हार्दिक स्वागत व अभिनंदन..,’ असं म्हटलं. यात त्यांनी नाव बदलण्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही. परंतु भगवान श्री लक्ष्मण यांची पावन नगरी असा उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर मात्र याची चर्चा रंगली होती. काही लोकांनी लखनौचं नाव बदलून लक्ष्मणपुरी ठेवण्याचाही सल्ला दिला.
शेषावतार भगवान श्री लक्ष्मण जी की पावन नगरी लखनऊ में आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन... pic.twitter.com/zpEmxzS3OE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 16, 2022
यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काही ठिकाणांची नावं बदलली होती. त्यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं होतं. त्यानंतर फैजाबादचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं. याशिवाय मुगलसरायचं स्टेशनचं नाव बदलून पंडित दीनदयाल रेल्वे स्टेशन करण्यात आलं आहे.