तुफान राडा! रिसेप्शनमध्ये नवरा-नवरीकडचे लोक भिडले; खुर्च्या फेकल्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:56 AM2024-02-10T11:56:09+5:302024-02-10T12:00:31+5:30
दोन्ही पक्ष एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना तसेच एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अमीनाबाद येथील बुद्ध लाल धर्मशाळेत लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं. याच दरम्यान वधू-वर पक्ष यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी संपूर्ण कॅम्पसमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. या प्रकरणाचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक खुर्च्या फेकताना दिसत आहेत.
सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना तसेच एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत आहेत. याच दरम्यान एका तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांनाही गंभीर दुखापत झाली.
दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर रिसेप्शन असल्याच्या ठिकाणची परिस्थिती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. लोकांमध्ये हाणामारी इतकी वाढली की परिस्थिती काही वेळ नियंत्रणाबाहेर होती. याच वेळी कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जो व्हायरल झाला आहे.
या घटनेदरम्यान मोठा गोंधळ झाला. हाणामारीदरम्यान खुर्च्या व इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केलं. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.