कमलेश तिवारी हत्याकांड : बिजनोरमधून मौलानाला अटक, गुजरातमधून सहा जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 09:39 AM2019-10-19T09:39:52+5:302019-10-19T09:42:43+5:30
कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे.
लखनऊः कमलेश तिवारी हत्याकांडात उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसनं या प्रकरणात सूरतमधून सहा संशयितांना ताब्यात घेतलं. कमलेश तिवारी हत्या प्रकरणात बिजनोरच्या दोन मौलानांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मौलाना मुफ्ती नईम काजमी, इमाम मौलाना अनवारुल हक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, 2015ला या दोन्ही मौलानांनी कमलेशला ठार करणाऱ्याला 1.5 कोटींचं बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होतं. कमलेश तिवारी यांची पत्नी किरन यांनी नाका हिंडोला पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव होतो, तसेच बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ येथील कमलेश तिवारी यांच्या कार्यालयात भगवे कपडे परिधान करून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला हल्लेखोरांनी कमलेश यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांनी कमलेश यांच्यावर गोळीबार केला. तसेच मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने त्यांच्यावर वार करून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कमलेश यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.Lucknow: Body of #KamleshTiwari taken to his native place in Mahmudabad, Sitapur. Tiwari was shot at in his office in Lucknow, yesterday. pic.twitter.com/ju0QWOanC9
— ANI UP (@ANINewsUP) October 18, 2019
Family members of #KamleshTiwari say that they won't cremate his body till Chief Minister Yogi Adityanath pays them a visit. Wife says,"I will self-immolate." https://t.co/ONDfEMePyRpic.twitter.com/hRfSb9LhFp
— ANI UP (@ANINewsUP) October 19, 2019
इसिसच्या रडारवर होते कमलेश तिवारी
गुजरातच्या एटीएसनं ऑक्टोबर 2017ला दोन इसिसच्या संशयित दहशतवाद्यांना पकडलं होतं. दोन्ही संशयित दहशतवाद्यांना कमलेश तिवारीचा व्हिडीओ दाखवून हत्या करण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी चौकशी केली असता, त्या दोन्ही संशयित दहशतवाद्यांनी कमलेश तिवारींचं नाव घेतलं होतं.