शाब्बास पोरी! BA पास तरुणी नोकरी सोडून झाली 'चाट क्वीन'; मित्रांकडून उसने घेतले 9 हजार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 04:05 PM2022-11-29T16:05:52+5:302022-11-29T16:15:52+5:30

2 वर्षे काम केल्यानंतर, नोकरीत समाधान मिळत नव्हतं. म्हणूनच तिने मित्रांकडून 9 हजार रुपये उसने घेतले आणि पूर्वांचल स्पेशल फास्ट फूड स्टॉल सुरू केला.

lucknow success story girl left private job became famous as chaat queen | शाब्बास पोरी! BA पास तरुणी नोकरी सोडून झाली 'चाट क्वीन'; मित्रांकडून उसने घेतले 9 हजार अन्...

शाब्बास पोरी! BA पास तरुणी नोकरी सोडून झाली 'चाट क्वीन'; मित्रांकडून उसने घेतले 9 हजार अन्...

googlenewsNext

गोरखपूरची रहिवासी असलेली ज्योती तिवारी हळूहळू लखनौची चाट क्वीन म्हणून प्रसिद्ध होत आहे. 22 वर्षीय ज्योतीने बीए पूर्ण केल्यानंतर नोकरी केली. 2 वर्षे काम केल्यानंतर, नोकरीत समाधान मिळत नव्हतं. म्हणूनच तिने मित्रांकडून 9 हजार रुपये उसने घेतले आणि पूर्वांचल स्पेशल फास्ट फूड स्टॉल सुरू केला. जे आता लोकांना खूप आवडत आहे. ज्योती तिवारी या स्टार्टअपद्वारे दररोज 700 ते 1000 रुपये कमावते.

स्वत:चाच व्यवसाय असल्याने ती खूप समाधानी आहे. ज्योती तिवारीने दिलेल्या माहितीनुसार, ती हे काम करत आहे हे तिच्या वडिलांना माहित नाही पण आईला नक्कीच माहित आहे. तिची बहीण लखनौमध्ये राहते, त्यामुळे तिच्यासोबत तिने अलीगंज येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ पूर्वांचल स्पेशल फास्ट फूड नावाचा एक छोटा स्टॉल सुरू केला आहे.

ज्योतीने सांगितले की पूर्वांचल चाट व्यतिरिक्त तिच्याकडे मोमोज, पाणीपुरी आणि मॅगी देखील मिळते. लवकरच इतर पदार्थ सुरू करणार आहे. किमतीबद्दल विचारले असता तिने सांगितले की, पूर्वांचल चाटची किंमत 20 रुपये आहे. तसेच मोमोजचे 6 पिस 20 रुपयांना आहेत. लखनौच्या लोकांना पूर्वांचल चाट सर्वाधिक आवडत असल्याचं म्हटलं आहे.

ज्योती तिवारीने सांगितलं की, पूर्वांचल चाट बनवण्यासाठी आधी कांदे आणि टोमॅटो चांगले तळले जातात, त्यानंतर चाट मसाल्यासोबत गरम मसाला आणि इतर मसाले टाकले जातात. नंतर बटाट्याच्या टिक्की एकत्र करून त्यात छोले आणि दही घालून बनवले जाते. ज्योतीच्या व्यवसायची सध्या सर्वत्र चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: lucknow success story girl left private job became famous as chaat queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.