लखनऊमध्ये संशयित दहशतवादी व पोलिसांमध्ये चकमक
By admin | Published: March 7, 2017 05:52 PM2017-03-07T17:52:25+5:302017-03-07T17:52:25+5:30
लखनऊ पोलीस आणि एका संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये एक दहशतवादी लपून बसला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 7 - लखनऊ पोलीस आणि एका संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुरगंज परिसरातील हाजी कॉलनीमध्ये एक दहशतवादी लपून बसला आहे. या दहशतवाद्याचे नाव सैफुल्ला असल्याचे सांगितले जात असून त्याने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. घटनास्थळी उत्तर प्रदेश पोलिसांव्यतिरिक्त एटीएसचे पथकही दाखल झाले आहे. परिसराला घेराव घालत ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
एका घरात लपून बसलेल्या या दहशतवाद्याने संध्याकाळी 4 वाजल्यापासून गोळीबार करायला सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा आयएसआयमधील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय, या दहशवाद्याचा मध्य प्रदेशातील ट्रेन स्फोटाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे. पोलिसांनी त्याला आत्मसर्मपण करण्यासाठी सांगितले, मात्र त्यानं नकार दिला आहे.
खबरदारी म्हणून ऑपरेशन संपेपर्यंत स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिरिक्त महासंचालक दलजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही संशयित कानपूर आणि लखनौमध्ये लपून बसल्याची माहिती त्यांनी मिळाली. कानपूरमधील संशयिताला अटक करण्यात आली असून ठाकुरगंज येथे दहशतवादी ज्या घरात लपला आहे, त्याला घेराव घालण्यात आला आहे. दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारवाई सुरू आहे'.
Suspected terrorist holed up by UP ATS in Thakurganj area of Lucknow. Operation in progress. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1SlD0Kp7az
— ANI UP (@ANINewsUP) March 7, 2017