कोरोनामुळे योगी सरकारची चिंता वाढली, सात जिल्ह्यांमध्ये 'मास्क' अनिवार्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:05 PM2022-04-18T17:05:43+5:302022-04-18T17:07:53+5:30

Corona : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कोविड प्रोटोकॉलवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता रोखता येईल. 

lucknow wearing face masks in public places is mandatory in 7 districts of up including ghaziabad lucknow | कोरोनामुळे योगी सरकारची चिंता वाढली, सात जिल्ह्यांमध्ये 'मास्क' अनिवार्य 

कोरोनामुळे योगी सरकारची चिंता वाढली, सात जिल्ह्यांमध्ये 'मास्क' अनिवार्य 

googlenewsNext

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे योगी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरसह हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कोविड प्रोटोकॉलवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता रोखता येईल. 

सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट  (Omicron XE Variant) देशभर पसरत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, दिल्ली-एनसीआर जवळील सर्व जिल्ह्यांसह राजधानी लखनऊमध्ये फेस मास्क लावणे आवश्यक करण्यात आले आहे. देशाच्या राजधानीत कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा परिणाम गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये दिसू लागला आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट लक्षात घेऊन या महिन्याच्या सुरुवातीलाच मास्क घालण्यापासून सूट दिली होती.

एवढेच नाही तर गाझियाबाद आणि नोएडामधील अनेक शाळांमधील मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर काही शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, गाझियाबाद आणि नोएडामध्ये पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. त्याचबरोबर गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाची लक्षणे असलेल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत कोरोना बाधित मुलांच्या फुफ्फुसात संसर्ग आढळून आलेला नाही, मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाने 1800492211 हा क्रमांक जारी केला असून, त्यावर कोरोनाची लक्षणे दिसताच माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोरोना हेल्प डेस्क आवश्यक करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या (NCR) जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. गेल्या 24 तासांत गौतम बुद्ध नगरमध्ये कोरोनाचे 65 आणि गाझियाबादमध्ये 20 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय, राजधानी लखनऊमध्ये 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसे पाहिले तर संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 115 रुग्ण समोर आले आहेत.

Web Title: lucknow wearing face masks in public places is mandatory in 7 districts of up including ghaziabad lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.