बुद्ध्यांंक चाचणीत लिडिया सर्वप्रथम

By admin | Published: September 6, 2015 10:13 PM2015-09-06T22:13:37+5:302015-09-06T23:58:08+5:30

भारतीय वंशाच्या लिडिया सबॅस्टियन (१२) या विद्यार्थिनीने मेन्सा बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीमध्ये सर्वाधिक १६२ गुण मिळवून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट

Lydia was the first to test the Buddha | बुद्ध्यांंक चाचणीत लिडिया सर्वप्रथम

बुद्ध्यांंक चाचणीत लिडिया सर्वप्रथम

Next

लंडन : भारतीय वंशाच्या लिडिया सबॅस्टियन (१२) या विद्यार्थिनीने मेन्सा बुद्ध्यांक (आयक्यू) चाचणीमध्ये सर्वाधिक १६२ गुण मिळवून प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे.
उच्च बुद्धिमत्तेच्या लोकांच्या मेन्सा या संस्थेने ही चाचणी घेतली होती. लिडियाने ही चाचणी दिलेल्या एकूण स्पर्धकांपैकी कॅटल थ्री बी पेपरमध्ये अवघ्या १ टक्का स्पर्धकांनी सर्वाधिक गुण मिळविले. लिडियाने एक मिनिट शिल्लक ठेवून पेपर सोडविला.
येथील बर्कबेक कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. लिडिया म्हणाली की, ‘अगदी सुरुवातीली मी काळजीत पडले होते; परंतु एकदा प्रश्न सोडवायला सुरुवात करताच मी अपेक्षेपेक्षाही जास्त मोकळेपणाचा अनुभवला.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Lydia was the first to test the Buddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.