म. गांधीजी बहुआयामी व्यक्तीमत्वाचे होते (भाग २)
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:33+5:302015-01-31T00:34:33+5:30
एस. क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्य्
Next
ए . क्यू. जामा म्हणाले, महात्मा गांधी हे नाव नाही तर एक विचार आहे. त्यांनी सर्व धर्मांना सोबत घेऊन या देशासाठी लढाई केली. आज त्यांच्या विचाराची गरज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आहे आणि त्यांचे विचार जगाला भुरळ घालत आहेत. त्याचा प्रत्ययही आपल्याला येतो. प्राचार्य आत्माराम उखळकर म्हणाले, गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज पुस्तकात या देशाच्या प्रगतीचा मार्ग लिहून ठेवला आहे. त्याच विचारांनी त्यांनी आयुष्यभर कार्य केले पण आपण त्यांच्या विचारांवर राज्य चालविले नाही. अन्यथा देशाचे आजचे चित्र वेगळे राहिले असते. औद्योगिकीकरणापूर्वी ग्रामीण भारताचा विकास साधण्याचे त्यांचे तंत्र होते. पंचवार्षिक योजना ग्रामीण विकासासाठी राबविल्या असत्या तर शेतकरी आणि ग्रामीण भारत स्वयंपूर्ण झाला असता. त्यानंतर उद्योग उभारणी करता आली असती. पण औद्योगिक धोरण राबविल्याने आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. विलास शेंडे यांनी प्रार्थना आणि बंधूता या विषयावर मत व्यक्त करताना गांधीजींच्या प्रार्थनेचे महत्त्व विशद केले. ते सर्वच धर्मांच्या प्रार्थना करीत होते. प्रार्थनेतून बंधूता आपोआप निर्माण होते, असे ते म्हणाले. सर्वोदयी विचारवंत देशपांडे गुरुजी यांनी सर्वधर्म प्रार्थना विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. गांधीजींच्या प्रार्थनासभेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यांच्या प्रार्थनासभेत सर्व धर्मांचे लोक सहभागी होत होते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन गांधी विचार प्रसारक रवी गुडधे यांनी केले.