माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:00 PM2023-04-17T22:00:42+5:302023-04-17T22:01:36+5:30

गांधी मैदानच्या सालिमपूर अहरा येथील ही घटना असून अंकित हा मूळ हाजीपूरचा रहिवाशी होता, तो नीटच्या तयारीसाठी येथे रुम करुन राहात होता

Maa mai ja raha hoon... NIIT student ends life by sending voice message to mother in patana | माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

माँ मै जा रहा हूँ... आईला व्हॉईस मेसेज करुन NIIT च्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

googlenewsNext

अगदी तारुण्यात असलेला आपला कर्तबगार आणि हुशार मुलाचे निधन ही कुठल्याही आई-वडिलांसाठी अत्यंत वेदनादायक आणि दु:खाचा डोंगर कोसळणारी घटना असते. बिहारच्या पाटणा जिल्ह्यात अशी ह्रदयद्रावक घटना घडली असून एमबीबीएससाठी नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आईला व्हॉईस मेसेज करुन आत्महत्या केली. २० वर्षीय अंकित राजने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मै जा रहा हूँ... असा व्हॉईस मेसेज आईला केला, तसेच रुममधील सामानाचा व्हिडिओही मोबाईलवर पाठवला आणि अंकितने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. 

गांधी मैदानच्या सालिमपूर अहरा येथील ही घटना असून अंकित हा मूळ हाजीपूरचा रहिवाशी होता, तो नीटच्या तयारीसाठी येथे रुम करुन राहात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला, आणि एफएसएलच्या पथकालाही बोलावलं. याप्रकरणी इतर विद्यार्थ्यांच्या मोबाईलमधून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण कुमार यांनी सांगितले. 

पोलिसांनी नातेवाईकांना माहिती देताच, घटनास्थळावर मुलाचे वडिल श्रीराम शर्मा यांच्यासह त्याची चुलत बहिण आणि इतर जवळचे नातेवाईक पोहोचले होते. ५ एप्रिल रोजीच एका कोचिंग क्लासेसमध्ये अंकितने नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश घेतला होता. विशेष म्हणजे अंकितच्या कोचिंगसाठी कुटुंबीयांनी गावकडची जमीन विकून पैशांचा बंदोबस्त केला होता. त्यामुळे, १० एप्रिल रोजी तो पाटणा येथे राहण्यासाठी आला होता. दोन भावांमध्ये तो घरातील मोठा होता. 

दरम्यान, अंकितने रविवारी सकाळी आईला फोन केला होता. काही वेळाच्या या संवादातच त्याने आईला सांगितले होते की, त्याचं मन पाटणा येथे लागत नाही. त्यानंतर, त्याने रुममध्ये सर्व सामान कुठं आहे, पैसे कुठे ठेवले आहेत, त्याची चावी कुठे आहे या सर्वांचा व्हिडिओ बनवून आईला पाठवला. तसेच, माँ मै जा रहा हूँ... असा व्हॉईस मेसेज त्याने आईला पाठवला होता. त्यामुळे, कुटुंबीय भयभीत झाले, व सातत्याने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, लाईटच्या वायरच्या सहाय्याने त्याने पंख्याला गळफास घेतला होता. 
 

Web Title: Maa mai ja raha hoon... NIIT student ends life by sending voice message to mother in patana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.