500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 06:44 PM2017-09-10T18:44:16+5:302017-09-10T18:45:28+5:30

नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.

The machine is not used to measure the old notes of 500 and 1000 rupees, the information will be disclosed | 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

Next

नवी दिल्ली, दि. 10 - नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.

नोटाबंदीनंतर जमा झालेल्या नोटा मोजण्यासाठी किती मशिन्स वापरण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळावी यासाठी 10 ऑगस्टला माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. त्यात बँकांनी जुन्या नोटा मोजण्यासाठी उधारीवरसुद्धा कोणत्या मशिनी घेतल्या नव्हत्या हेही समोर आलं आहे. आरटीआयला उत्तर देताना आरबीआयनं सांगितलं आहे की, आरटीआय अधिनियम, 2005च्या कलम 7(9)नुसार माहिती दिली जाऊ शकत नाही. नोटा मोजण्याचं काम सातत्यानं सुरूच राहिल्यानं त्या कधीपासून मोजण्यास सुरुवात केली हे सांगू शकत नाही, असंही आरबीआय स्पष्ट केलं आहे.

30 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार, 15.28 लाख कोटी म्हणजेच 99 टक्के 500 आणि 1000च्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या.15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी 16,050 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी 500 रुपयांच्या 1,716.5 कोटी रुपयांच्या नोटा आणि 1000च्या 685.8 कोटी नोटा चलनात होत्या. ज्यांची किंमत 15.44 लाख रुपये होती. तसेच नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बेहिशोबी काळा पैसा पांढरा झाला याचाही आकडा आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. 

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

Web Title: The machine is not used to measure the old notes of 500 and 1000 rupees, the information will be disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.