मदरशांमध्येही झेंडावंदन व्हायलाच हवे - हायकोर्ट
By admin | Published: September 2, 2015 10:14 AM2015-09-02T10:14:24+5:302015-09-02T10:14:46+5:30
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी मदरशांमध्ये झेंडावंदन व्हायलाच हवे असे मत अलाहाबाद हायकोर्टाने मांडले आहे.
ऑनलाइन लोकमत
अलाहाबाद, दि. २ - स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी मदरशांमध्ये झेंडावंदन व्हायलाच हवे असे मत अलाहाबाद हायकोर्टाने मांडले आहे. राज्य सरकारने या संदर्भात पावले उचलावीत असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.
उत्तरप्रदेशमधील अलीगढमध्ये राहणारे अरुण गौड यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी सरकारी कार्यालय व शाळांप्रमाणेच मदरशांमध्येही झेंडावंदन करावे अशी मागणी गौड यांनी केली होती. अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि यशवंत वर्मा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. उत्तरप्रदेश सरकारने मदरशांमध्येही झेंडावंदन होईल याची दक्षता घ्यावी असे खंडपीठाने म्हटले आहे.