सरदार पटेलांच्या सर्वात उंच पुतळ्याला लागणार मेड इन चायनाचं लेबल

By admin | Published: October 17, 2015 02:34 PM2015-10-17T14:34:33+5:302015-10-17T14:34:33+5:30

नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२ मीटरच्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चिनी फाउंड्रीला देण्यात आल्याचे आउटलूक मॅगेझिनने म्हटले आहे.

Made in China label for Sardar Patel's tall statue | सरदार पटेलांच्या सर्वात उंच पुतळ्याला लागणार मेड इन चायनाचं लेबल

सरदार पटेलांच्या सर्वात उंच पुतळ्याला लागणार मेड इन चायनाचं लेबल

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १७ - मेक इन इंडियाचं स्वप्न केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातल्या उद्योजकांना दाखवणा-या नरेंद्र मोदींच्या लाडक्या म्हणजे जगातल्या सगळ्यात उंच ठरणा-या १८२ मीटरच्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचे काम चिनी फाउंड्रीला देण्यात आल्याचे आउटलूक मॅगेझिनने म्हटले आहे. 
हा पुतळा बनवण्यासाठी जगातली सगळ्यात मोठी फाउंड्री असलेल्या जिआंग्झी टाँगक्विन्ग मेटल हँडिक्राफ्ट कंपनीच्या ५१ हजार चोरस मीटरच्या आवारात तब्बल ७०० कामगार झटत आहेत.
स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव असलेल्या या प्रकल्पाचे काम २,९८९ कोटी रुपयांना लार्सन अँड टुब्रोने स्वीकारल्यानंतर पुतळ्याचे काम जिआंग्झीला देण्यात आले. या कंपनीच्या मालकाच्या मुलाने हुआन चांगने सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या निर्मितीसाठी त्यांची निवड करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आणि आत्तापर्यंत त्यांनी १५३ मीटर उंचीचा तांब्याचा टॉवर तिआनमेन चौकात उभारला असल्याचे नमूद केले. 
असा पुतळा उभारून भारत आयर्न मॅनला मानवंदना देत असेल तर ती चांगलीच बाब असल्याचेही चांगने म्हटले आहे. 
दिल्लीस्थित राम सुतार यांनी या पुतळ्याचे डिझाइन केले असून त्यांनीही या प्रकल्पाला चिनी हात लागत असल्याचे मान्य केले. सध्या नॉयडामध्ये सरदारांचा ३० मीटर उंचीचा ब्राँझचा पुतळाही बनवण्यात येत आहे. त्याबरहुकूम मुख्य पुतळा चिनमध्ये बनवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये हा पुतळा चिनमध्ये बनेल आणि नंतर तो येथे जोडण्यात येईल असेही सुतार म्हणाले. 
अर्थात, आउटलूकच्या सांगण्यानुसार लार्सन अँड टुब्रोच्या अधिका-यांनी हा पुतळा जागेवर बांधण्यात येणार असल्याचे आणि या जेगजवळच फाउंड्री व कार्यशाळा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. हा प्रकल्प म्हणजे केवळ पुतळा नसून ते एक मेमोरीयल असेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.

Web Title: Made in China label for Sardar Patel's tall statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.