दहशतवाद्यांकडे सापडली 'मेड इन पाकिस्तान' औषधं

By admin | Published: October 6, 2016 04:13 PM2016-10-06T16:13:37+5:302016-10-06T16:13:37+5:30

ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि औषधांचा साठा सापडला. एक-47, ग्रेनेड लाँचर्स, बंदुकीच्या गोळ्या, जीपीएस यंत्रणा, नकाशे आणि खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे.

Made in Pakistan 'medicines found by terrorists | दहशतवाद्यांकडे सापडली 'मेड इन पाकिस्तान' औषधं

दहशतवाद्यांकडे सापडली 'मेड इन पाकिस्तान' औषधं

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.8 - जम्मू काश्मीरमधील हंदवाडामध्ये भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ठार झालेल्या दहशतवाद्यांजवळ लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि औषधांचा साठा सापडला. एक-47, ग्रेनेड लाँचर्स, बंदुकीच्या गोळ्या, जीपीएस यंत्रणा, नकाशे आणि खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे. त्याच्याकडील सापडलेल्या औषधांच्या पाकिटांवर पाकिस्तानी निशाण (made in Pakistan) आढळून आले आहेत, अशी माहिती कर्नल राजीव सिंग यांनी दिली आहे. 
 
आणखी बातम्या
गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता, हाय अलर्ट जारी
सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी भारतीय लष्करी कॅम्पवर गोळीबार करायला सुरुवात केली. भारतीय सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चकमक सुरू होती. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत.  
 

Web Title: Made in Pakistan 'medicines found by terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.