भीषण अपघात! डंपर आणि रिक्षाच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 04:38 PM2023-03-13T16:38:23+5:302023-03-13T16:39:47+5:30

बिहारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे.

madhepura road accident in mdhepura 5 people died due to collision between hiva and auto | भीषण अपघात! डंपर आणि रिक्षाच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

भीषण अपघात! डंपर आणि रिक्षाच्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील उदकीशूनगंज उपविभागांतर्गत चौसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोशईजवळ आज सकाळी रिक्षा आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. डंपर आणि रिक्षा  यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. सर्व जखमी आणि मृत हे रिक्षाने भागलपूर येथे गंगा स्नानासाठी जात होते. 

या अपघातातील सर्व सहरसा जिल्ह्यातील बसनाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भड्डी दुर्गापूर येथील आहेत. 

आज सकाळी त्याच गावातील भड्डी दुर्गापूर येथील १० जण महादेवपूर घाटावर रिक्षातून गंगा स्नान करण्यासाठी जात असताना, त्यांची रिक्षा चौसा एसएच 58 वर घोशाई गोठ बस्तीजवळ पोहोचली, तेव्हा वाहतूक कोंडी झाली. समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ऑटोच्या पुढच्या भागाच्या चिंध्या झाल्या. चार जण जागीच ठार झाले. तर अन्य जखमीला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

Satish Kaushik यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण; आता दिल्ली पोलीस उचलणार मोठं पाऊल!

या अपघातात ४ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने चौसा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथून डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगून त्यांना उच्च केंद्रात पाठवले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एसएच 58 वर निदर्शने करत सुमारे दोन तास रास्ता रोको केला. 

या अपघातात राधे राम (६०), चालक राजा बाब स्वर्णाकर (२५), कैलाश मंडल (५५), धीरेन मंडल (३०), सोहगिया देवी (७०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जखमींमध्ये सत्रहन मंडल (६०), संजुला देवी (५५), रमेश मंडल (४०), रेणू देवी (३५), हाकरी देवी (५०) यांचा समावेश आहे.

Web Title: madhepura road accident in mdhepura 5 people died due to collision between hiva and auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात