‘एबीसी’च्या अध्यक्षपदी मधुकर कामथ यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 05:03 AM2019-09-21T05:03:25+5:302019-09-21T05:03:35+5:30

ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेडचे मधुकर कामथ यांची २०१९-२०२० या वर्षासाठी एकमताने निवड झाली.

Madhukar Kamath elected as ABC President | ‘एबीसी’च्या अध्यक्षपदी मधुकर कामथ यांची निवड

‘एबीसी’च्या अध्यक्षपदी मधुकर कामथ यांची निवड

Next

नवी दिल्ली : ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन्सच्या (एबीसी) अध्यक्षपदी डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेडचे मधुकर कामथ यांची २०१९-२०२० या वर्षासाठी एकमताने निवड झाली. एबीसीच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली तर याच कालावधीसाठी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे देवेंद्र व्ही. दर्डा यांचीएकमताने उपाध्यक्षपदी निवड झाली. कामथ यांना अ‍ॅडव्हरटायझिंग अँड मार्केटिंग सर्व्हिसेसमध्ये चारपेक्षा जास्त दशकांचा अनुभव असून त्यांनी तत्कालीन मुद्रा (आताचा डीडीबी मुद्रा) ग्रुपमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीत काम केले आहे.
मधुकर कामथ हे अ‍ॅडव्हरयाझिंग एजन्सीज असोसिएशन आॅफ इंडियाचे (एएएआय) अध्यक्ष, द अ‍ॅडव्हरटायझिंग स्टँडर्डस कॉन्सिल आॅफ इंडियाचे (एएससीआय) अध्यक्ष आणि मुद्रा फौंडेशनचे अध्यक्ष आणि एमआयसीएच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरपर्सनही होते. कामथ हे सध्या डीडीबी मुद्रा ग्रुपचे चेअरमन एमिरीटस आणि इंंटरबँ्रड इंडियाचे मेंटॉर आहेत.
२०१९-२०२० वर्षासाठी एबीसी कॉन्सिलचे सदस्य खालीलप्रमाणे-
जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी

मधुकर कामथ (डीडीबी मुद्रा प्रायव्हेट लिमिटेड-चेअरमन), शशीधर सिन्हा (मीडिया ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड), श्रीनिवासन के. स्वामी (आरके स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेड), विक्रम सखुजा (मेडिसन कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड- मानद कोषाध्यक्ष)
प्रकाशकांचे प्रतिनिधी
देवेंद्र व्ही. दर्डा (लोकमत मिडिया प्रायव्हेट लिमिटेड- उपाध्यक्ष), होरमुसजी एन. कामा (द बाँबे समाचार प्रायव्हेट लिमिटेड), शैलेश गुप्ता (जागरण प्रकाशन लिमिटेड), चंदन मजुमदार (एबीपी प्रायव्हेट लिमिटेड), राज कुमार जैन (बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड), प्रताप जी. पवार (सकाळ पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड), रियाद मॅथ्यू (मलयाला मनोरमा कंपनी लिमिटेड- मानद सचिव), प्रवीण सोमेश्वर (एचटी मीडिया
लिमिटेड.)
जाहिरातदारांचे प्रतिनिधी
मयंक पारीक (टाटा मोटार्स लिमिटेड), करूणेश बजाज (आयटीसी लिमिटेड), विवेक नायर (महिंद्र अँड महिंद्र लिमिटेड), देबब्रत मुखर्जी (युनायटेड ब्रिवरीजेस लिमिटेड), सचिवालय- होरमुझद मसानी (सरचिटणीस).

Web Title: Madhukar Kamath elected as ABC President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.