मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अनिश्चित काळासाठी उपोषणावर

By admin | Published: June 9, 2017 06:40 PM2017-06-09T18:40:34+5:302017-06-09T20:36:27+5:30

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलनं सुरु आहेत.

Madhya Pradesh Chief Minister on fast for fast | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अनिश्चित काळासाठी उपोषणावर

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अनिश्चित काळासाठी उपोषणावर

Next

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलनं सुरु आहेत. मध्यप्रदेशातील आंदोलनात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. तीन दिवसानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान माध्यमांसमोर आले. राज्यातील शांततेसाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषण करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता शिवराज सिंह चौहानांनी उपोषणाचा मार्ग स्वीकाराला आहे.
मध्य प्रदेशात सलग चौथ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक गाड्या जाळल्या, तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.
दरम्यान मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर भाजपकडून काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यातच काँग्रेस नेत्यांच्या भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ समोर आल्याने भाजपच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.

याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही मध्य प्रदेशातील मंदसौरला आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राजस्थानच्या सीमेवर अडवलं. त्यानंतर राहुल गांधी पोलिसांना गुंगारा देऊन दुचाकीवर मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाले. मात्र पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं.

Web Title: Madhya Pradesh Chief Minister on fast for fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.