हृदयद्रावक! नातीच्या लग्नात डान्स करताना आजीला हार्ट अटॅक; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:18 PM2022-12-16T12:18:25+5:302022-12-16T12:18:42+5:30
नातीच्या लग्नात नाचत असताना एका वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
आजकाल लग्न समारंभ किंवा कार्यक्रमात डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सिवनी येथील बंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखरी गावात समोर आला आहे. जिथे नातीच्या लग्नात नाचत असताना एका वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच घरात लग्नाचं आनंदादायी वातावरण असताना ही घटना घडल्याने आनंदावर विरजण पडलं आहे,
हळदीच्या कार्यक्रमात या आजीचा मृत्यू झाला असून ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बंडोल पोलीस स्टेशनचे प्रभारी दिलीप पंचेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिवनी जिल्ह्यातील बंडोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाखरी गावातील साहू कुटुंबातील एका विवाह सोहळ्यात नाचता नाचता एका वृद्ध महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
महिलेच्या मृत्यूनंतर लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले आहे. सिवनी येथील बखरी गावातील साहू कुटुंबातील मुलीचे छिंदवाडा जिल्ह्यात लग्न ठरले होते. 14 डिसेंबर रोजी हळदी समारंभात, लग्नाच्या एक दिवस आधी, वधूच्या आजोबांच्या चार बहिणी (आजी) एकत्रितपणे आनंदाने नाचत होत्या. दरम्यान, भीमगड येथील शोदा साहू नाचत असताना जमिनीवर पडल्या. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एंका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"