मध्य प्रदेशची आदिवासी मुलगी आॅक्सफर्डला

By Admin | Published: September 18, 2016 04:12 AM2016-09-18T04:12:38+5:302016-09-18T05:58:16+5:30

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या वर्षीय आशा गोंड या आदिवासी मुलीसाठी आकाशच ठेंगणे झाले आहे.

Madhya Pradesh tribal daughter Oxford | मध्य प्रदेशची आदिवासी मुलगी आॅक्सफर्डला

मध्य प्रदेशची आदिवासी मुलगी आॅक्सफर्डला

googlenewsNext

भोपाळ : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या वर्षीय आशा गोंड या आदिवासी मुलीसाठी आकाशच ठेंगणे झाले आहे. ती आता इंग्रजी भाषा शिकण्यासाठी थेट आॅक्सफोर्डला निघाली आहे. पासपोर्टचं काम पूर्ण झालं की लवकरच ती इंग्लंडला रवाना होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर स्वप्नही सत्यात उतरते. फक्त गरज असते ती चिकाटीची. आशा गोंडच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. 
आशा गोंड मूळची जानवार गावातील आहे. जर्मनीहून रेनहार्ड या तेथील आदिवासी मुलांना स्केटिंग आणि इंग्रजी भाषा शिकवायला आल्या होत्या. त्यामध्ये आशाचाही समावेश होता. त्यांच्यासोबत शिकताना आशाने इंग्रजी आत्मसात केली. त्या भाषेविषयीचे तिचे कुतुहूल वाढत गेली आणि आवडही तिची प्रगती पाहून रेनहार्ड यांनी आशाला इंग्लंडला सोबत नेऊन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आशा नुकतीच दहावीची परीक्षा पास झाली आहे. इंग्रजीमध्येही तिने चांगली प्रगती केली आहे. इंग्लंडला नेऊन इंग्रजी भाषा शिकवण्याचे आश्वासन मी तिला दिले होते. तिचे आई-वडील मुलीला पाठवण्यास तयार नव्हते. त्यांना तयार करण्यात आठ महिने गेले. मी अनेकदा आईशी बोलले. तिला परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचे महत्त्व त्यांना पटवून देणे अवघड होते, असे रेनहार्ड म्हणाल्या.
पालक तयार होत नव्हते. त्यांना मुलीची काळजी वाटत होती. त्यामुळे रेनहार्ड यांनी स्थानिक आमदार आणि आशाचे शिक्षक अवध बिहारी यांची मदत घेतली. तुमची मुलगी सुरक्षित राहील आणि तिला खूप शिकायची संधी मिळेल, असे त्यांनी पटवून दिले. तेव्हा कुठे ते परदेशात मुलीला पाठवायला तयार झाले. (वृत्तसंस्था)
>इतरांनाही इंग्रजी शिकविणार
आशाने मिळालेल्या संधीचे नेहमीच सोने केले 
आणि यापुढेही करण्याचे आहे. आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन पुन्हा परत आल्यानंतर मुलांना शिकवण्याची तिची इच्छा आहे. परत आल्यानंतर लगेच लग्न लावून देण्याचे तिच्या आई-वडिलांनी ठरविले आहे.

Web Title: Madhya Pradesh tribal daughter Oxford

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.