मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य, 3 वर्षांनंतर कुटुंब न्यायालयानं लग्न ठरवलं अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:19 PM2022-04-07T16:19:36+5:302022-04-07T16:20:36+5:30

खरे तर, ग्वाल्हेर येथील एका २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातीलच एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुहागरात्रीच्या दिवशी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से आपल्या पतीला सांगायला सुरुवात केली अन्...

Madhya pradesh wife told a truth to husband on the first night after 3 years family court declared marriage void | मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य, 3 वर्षांनंतर कुटुंब न्यायालयानं लग्न ठरवलं अमान्य

मधुचंद्राच्या रात्री पत्नीनं सांगितलं कटू सत्य, 3 वर्षांनंतर कुटुंब न्यायालयानं लग्न ठरवलं अमान्य

googlenewsNext

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका नवविवाहित महिलेने सुहागरात्रीच्या दिवशी पतीला असे काही सत्य सांगितले, की तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाला होता, असे तिने आपल्या पतीला सांगितले. हे ऐकल्यानंतर पतीने दुसऱ्याच दिवशी तिला तिच्या माहेरी सोडले आणि विवाह रद्द ठरवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात 3 वर्षे चालले. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेत हा विवाह अमान्य अथवा रद्द असल्याचा निकाल दिला.

खरे तर, ग्वाल्हेर येथील एका २५ वर्षीय तरुणाचे २०१९ मध्ये शहरातीलच एका २१ वर्षीय तरुणीशी लग्न झाले होते. लग्नानंतर सुहागरात्रीच्या दिवशी पत्नीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से आपल्या पतीला सांगायला सुरुवात केली. याच वेळी पत्नीने लग्नापूर्वी आपल्यावर बलात्कार झाल्याचेही पतीला सांगितले. हे ऐकून पती सुन्न झाला आणि त्याने हा संपूर्ण प्रकार घरातील सदस्यांना सांगितला. 

यानंतर घरच्यांच्या संमतीने त्याने पत्नीला तिच्या मारेरी नेऊन  सोडले आणि तो पुन्हा तिला घेण्यासाठी कधीच गेले नाही. यानंतर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी जेव्हा चर्चा केली, तेव्हा या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आले आणि यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

कौटुंबिक न्यायालयाने 'रद्द' घोषित केला विवाह -
घटनेचा खुलासा झाल्यानंतर, पत्नीच्या मामाच्या मुलानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले. यावर लग्न मोडल्यानंतर पीडितेने आरोपी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र तरीही पती तिचा स्वीकार करण्यास तयार झाला नाही. या प्रकरणी पतीने कौटुंबिक न्यायालयात विवाह रद्द ठरवण्यासाठी अर्ज केला. याप्रकरणी तरुणाच्या पत्नीला तिची बाजू ठेवण्यासाठी अनेक वेळा नोटीस पाठवण्यात आली. मात्र ती आली नाही. अखेर न्यायालयाने हा विवाह रद्द ठरवला.

Web Title: Madhya pradesh wife told a truth to husband on the first night after 3 years family court declared marriage void

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.